सातारा (प्रतिनिधी) : जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालायत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनात भारत विकास गृपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते जागतिक मराठी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संमेलनाचे अद्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, जागतिक मराठी अकादमीचे अद्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी, सांस्कृतीक कार्यमंत्री अशिष शेलार, उद्योग मंत्री उदय सामंत, पत्रकार राजीव खांडेकर, विकास देशमुख अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
या वेळी गायकवाड म्हणाले,”देशभरातील १ लाख लोक बीव्हीजी नावाच्या संस्थेत काम करत आहेत. या पुढे १० लाख भारतीय युवकांना भारत सरकार व बीव्हीजीच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे.
भक्तीरसाचा अवलंब केला तर यश मिळतेच. बीव्हीजी भक्तीरसातुन स्वच्छतेचे काम करते. त्यामुळे अयोध्येतील राम मंदीरासहीत अनेक मंदीरे स्वच्छ ठेवण्याचे काम बीव्हीजी करत आहे.”
बीव्हीजी स्वच्छता सेवे बरोबर आरोग्य व कृषी क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. हृद्यरोग, यकृताचे अजार, कॅन्सर या सारख्या भयावह आजारांवरची विविध औषधे निर्माण करण्यात येत आहे. देशभरातील अनेक रुग्णांना या औषधांचा फायदा होत आहे.
पवार म्हणाले, हणमंतराव गायकवाड हे जिद्द व चिकाटीचे आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे परदेशात सुद्धा ते त्यांच्या कार्याचा ठसा उमटवतील. मराठी उद्योजकांचे सुवर्णयुग गायकवाड यांनी सुरु केले आहे.