पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतरशालेय नाटिका स्पर्धेला आज (दि. 11) सुरुवात झाली. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भालबा केळकर नाटिका स्पर्धा 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी आहे. स्पर्धेचे यंदाचे 32वे वर्ष आहे. पहिल्या सत्राची सुरुवात भारतीय विद्या भवन संस्थेच्या परांजपे विद्या मंदिराने सादर केलेल्या चि. का. गो. या नाटिकेने झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने ‘जीवन त्यांना कळले हो’, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडीने ‘एकाच तिकिटात तीन बालनाट्ये’, एस. पी. एम. इंग्लिश स्कूलने ‘मॅजिकल फॅक्टरी’ या नाटिका सादर केल्या.
सायंकाळच्या सत्रात माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (कथा आमच्या शिक्षणाची), ॲपॉस्ट्रॉफी नेक्स्ट (खट्याळ उंदिर), महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल (हास्यमंत्र), टँगी ट्विस्टर बॉक्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस् (संप), सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (मुकुटाचा मान कोणाला?) या नाटिका सादर झाल्या.
रविवारी (दि. 12) सादर होणाऱ्या नाटिका : दुपारी 1 ते 4
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे आरुणी विद्या मंदिर (विकल्प बन), रॅडक्लिफ स्कूल (जादूगार), मानव्य (वाढदिवस), आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे (व्हाईट वॉश), आकांक्षा बालरंगभूमी (रंगीत गोष्ट).
सायंकाळी 5 ते 8
श्रीनिवास सिरिन काऊंटी एबीसी को.ऑप. सोसायटी (पणजीची गोष्ट), शिशु विहार प्राथमिक शाळा (शेवटचा गणपती), स्वर-साधना (मॉनिटर), कला केंद्र (माझा बाप्पा), नाटकाची शाळा (मिशन गणपती).
गुरुवारी (दि. 16) पारितोषिक वितरण समारंभ
भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 16) आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रसाद वनारसे यांच्या हस्ते होणार आहे.