पुणे :‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए) तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी (संस्थापक,व्हीके ग्रुप) आणि ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनिअर जयंत इनामदार(संस्थापक,स्टर्डकॉम कन्सल्टंट्स) यांना आज प्रदान करण्यात आला.आर. बी. सुर्यवंशी (उपाध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्मिता पाटील (अध्यक्ष, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल, माही ) उपस्थित होत्या.हा कार्यक्रम शुक्रवार, १० जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, रॉयल हॉल, गार्डन कोर्ट, एनडीए रस्ता येथे उत्साहात पार पडला.या वार्षिक पुरस्काराचे हे १८ वे वर्ष होते.
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए) चे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट संजय तासगांवकर, चेअरमन आर्किटेक्ट महेश बांंगड आणि सचिव आर्किटेक्ट निनाद जोग यांनी स्वागत केले.’सॉलिटेअर ग्रुप’ च्या सहकार्याने हा सोहळा पार पडला.हा पुरस्कार सोहळा १८ व्या वर्षात पदार्पण करत असून, पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि विशेष प्रशस्तीपत्र यांचा समावेश होता.
ईशा उमराणी यांनी सूत्रसंचालन केले. राजीव राजे यांनी प्रास्ताविक केले.संजय तासगावकर यांनी आभार मानले. या प्रसंगी दिवाकर निमकर,डॉ.पूर्वा केसकर, वीरेंद्र बोराडे, नितीन भोळे,, शेखर गरुड, ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री. बडवे, आशुतोष जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आर.बी.सूर्यवंशी म्हणाले,’ बांधकाम तंत्रात बदल होत असून आर्किटेक्ट, इंजिनिअर्स यांनी बदल स्वीकारला पाहिजे. नवनवीन सेवा दिल्या पाहिजेत. निवृत्त न होता,योगदान देत राहिले पाहिजे.हे करताना बदलाला दिशा दिली पाहिजे’.
प्रमुख पाहुण्या सौ.स्मिता पाटील म्हणाल्या,’शहर आणि समाजाच्या विकासात आर्किटेक्ट, इंजिनियर यांचे योगदान महत्वाचे आहे. विश्वास कुलकर्णी, जयंत इनामदार यांचे योगदान प्रेरक आहे. नवकल्पना आणि शाश्वत विकास यांची सांगड घातली पाहिजे.
मनोगत व्यक्त करताना जयंत इनामदार म्हणाले,’ बांधकाम व्यवसायात कामगारांपासून सर्वांची सुरक्षा,वेळ आणि वाया जाणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण आणणे महत्वाचे असते.हीच उदीष्टे ठेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले.
मनोगत व्यक्त करताना विश्वास कुलकर्णी म्हणाले,’ सुरुवातीच्या खडतर वाटचालीनंतर मी संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला. प्रामाणिकपणामुळे ग्राहक हेच मित्र बनत गेले. पूर्वी झाडाकडे मान उंच करून पाहावे लागत असे, आता इमारतीकडे मान उंच करून पाहावे लागते. आणि तिथुन झाडाकडे वाकून पाहावे लागते.४० वर्षापूर्वीच्या इमारतीचे पुनर्विकास सध्या चालू आहे.पुढे ४० वर्षांनी या पुनर्विकासाचा पुन्हा पुनर्विकास होणार का ? तो कसा असेल याची उत्सुकता असण्या पेक्षा काळजीच अधिक आहे