मुंबई: भारतातील अग्रगण्य घर आणि कार्यालय फर्निचर ब्रँड आणि गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप मधील गोदरेज अँड बॉयस कंपनीचा भाग गोदरेज इंटेरियो यांनी स्केचर्स नॅशनल डिस्ट्रीब्युशन सेंटर (NDC) च्या ऑफिस आणि सुविधा ब्लॉकचे इंटिरियर काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. स्केचर्सचे हे भारतातील पहिले स्वतःचे वेअरहाऊस असल्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. 18 मीटर उंची असलेले हे वेअरहाऊस भारतातील या प्रकारातील सर्वात मोठ्या सुविधांपैकी एक आहे.
हा प्रकल्प लोढा इंडस्ट्रियल लॉजिस्टिक पार्क फेज-II A1 ब्लॉक, नरहेन, तळोजा MIDC, नवी मुंबई येथे स्थित असून 48,670 चौ.फुटांमध्ये पसरलेला आहे. गोदरेज इंटेरियोच्या डिझाईन & बिल्ड प्रोजेक्ट्स टीमला स्केचर्सच्या ब्रँड ओळखीसोबत सुसंगत, नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम जागा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या प्रकल्पातील प्रमुख नवकल्पना म्हणजे 3.6 मीटर उंचीवर MS ग्रिड संरचना अंमलात आणणे. यामुळे सेवा पुरवताना आणि देखभालीसाठी कार्यक्षम जागा निर्माण करताना आवश्यक 6.4 मीटर छताची उंची प्राप्त झाली.
गोदरेज इंटेरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले, “स्केचर्ससोबतचे हे सहकार्य विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय डिझाईन आणि बिल्ड सोल्यूशन्स पुरविण्याच्या आमच्या बांधिलकीचे उदाहरण आहे. भारतातील आघाडीच्या आठ शहरांमधील ऑफिस स्पेस मार्केट 2024 च्या पहिल्या सहामाहीत 34.7 दशलक्ष चौ.फुटांपर्यंत पोहोचले. यात वार्षिक 33% वाढ झाली आहे आणि वर्षअखेर 70 दशलक्ष चौ.फुटांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. आम्ही या वाढीचा फायदा घेण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या सज्ज आहोत. जलद प्रकल्प कार्यक्षमतेने अंमलात आणण्यासाठी आमच्या टीमच्या क्षमतांमध्ये, कौशल्यांमध्ये आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये सतत सुधारणा करत आहोत. आमचे कौशल्य कार्यालये, आरोग्यसेवा, शिक्षण, रिटेल, परिवहन हब्स तसेच डेटा सेंटर्स आणि संग्रहालये यांसारख्या विशिष्ट सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहे. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन आम्हाला सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील ग्राहकांच्या सतत बदलत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करतो आणि भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख कंपनी म्हणून आमची भूमिका बळकट करतो. सध्या, आमचे गोदरेज इंटेरियो प्रोजेक्ट्स B2B विभागातील आमच्या एकूण उत्पन्नात 26% योगदान देतात आणि आर्थिक वर्ष 25 पर्यंत 30% CAGR ने वाढ होण्याच्या दिशेने आहेत.”
प्रकल्पातील प्रमुख ठळक मुद्दे:
1. संपूर्ण जागेचे प्रभावी स्वरूप निर्माण करणाऱ्या उंच डबल-हाइट सीलिंगसह भव्य स्वागत लॉबी
2. संपूर्ण कार्यालयात आधुनिक औद्योगिक संकल्पना. त्यामध्ये मीटिंग रूमसाठी कोरुगेटेड शीट क्लॅडिंग आणि रंग व आकार यांचे अफलातून मिश्रण आहे.
3. खेळ आणि त्यासंदर्भातील उपक्रम यावरील स्केचर्सचा असलेला भर याच्याशी सुसंगत वेअरहाऊसचा दृश्य लाभ देणारे केबिन्स.
4. विचारपूर्वक नियोजित फर्निचर व्यवस्था, जागा वाचवणारी सजावट, हिरवळ आणि किचन प्रॉप्स असलेले आकर्षक कॅफेटेरिया.
5. शाश्वतता आणि सांस्कृतिक सुसंगतपणा सुनिश्चित करत IGBC आणि ग्रीन बिल्डिंग मार्गदर्शक तत्वांचे पालन,
या प्रकल्पाचा व्यापक कार्यक्षेत्रामध्ये अंतर्गत सुविधा जसे की वीटकाम, पार्टीशन्स, दरवाजे, MS कामे, रंगकाम, फ्लोअरिंग, भिंतींवरील क्लॅडिंग, पॅनेलिंग, छत उभारणी, विनाइल ग्राफिक्स, लोगो कार्यान्वयन, ध्वनीशास्त्र उपाय, लँडस्केपिंग आणि ग्रीन वॉल्सचा समावेश आहे. यामध्ये कॅफेटेरिया आणि स्वच्छतागृहे यांसारख्या विशेष क्षेत्रांचा तसेच फर्निचर आणि MEP प्रणाली जसे की प्लंबिंग, HVAC, यांत्रिक वायुवीजन आणि विद्युत पायाभूत सुविधा यांचाही समावेश होता.
गोदरेज इंटेरियोने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या जागतिक ब्रँडसाठी नाविन्यपूर्ण, कार्यक्षम आणि सौंदर्यपूर्ण जागा तयार करण्यात आपले स्थान मजबूत केले आहे. त्यांनी 1500 हून अधिक प्रकल्प, 100 दशलक्ष चौ.फुटांहून अधिक क्षेत्र व्यापले असून कॉर्पोरेट कार्यालये, सरकारी सुविधा, बँकिंग, पायाभूत सुविधा (मेट्रो, विमानतळ), संग्रहालये, ऑडिटोरियम, आरोग्यसेवा, आदरातिथ्य, वेअरहाऊसेस आणि रिटेल जागा अशा विविध क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. सामान्य कंत्राटी, टर्नकी प्रकल्प आणि डिझाईन आणि बिल्ड सेवा यांसारख्या सर्वसमावेशक उपाय सुविधा पुरवून भारतात अत्याधुनिक सुविधांमध्ये गुंतवणूक करत गोदरेज इंटेरियो प्रत्येक ग्राहकाच्या जागतिक दर्जाच्या इंटेरियर सुविधा पुरविण्यासाठी अद्वितीय गरजा पूर्ण करण्याकरता सज्ज आहे.