पुणे- माय मराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. हा आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा ऐतिहासिक साहित्यक्षण आहे.याच पार्श्वभूमीवर सरहद संस्थेच्या सीबीएससी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यातीलच एक भाग म्हणून नाट्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
नाटक म्हणजे कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं होणाऱ्या प्रयत्नांची वाटचाल. नाटक म्हणजे एक साधना आहे.नाट्य प्रशिक्षणाने व्यक्तिमत्व विकास होतो, तसेच अभिनय, नाट्य वाचन, काव्यवाचन,संवाद लेखन, सूत्रसंचालन,निवेदन, नृत्य आणि रंगमंचांशी निगडित विविध अंगाचे प्रशिक्षण व त्यातून व्यक्तिमत्व विकास साधण्याची संधी मिळते. अशा अनेक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून मिळाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लेखक दिग्दर्शक व नाट्य प्रशिक्षक देवेंद्र भिडे उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिरातून मुलांमधील सुप्त अभिनय कलागुणांना योग्य वळण मिळते. मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील कलाकार घडतो. नाटक करताना नाटकातील काही तांत्रिक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. नाटकाची सगळी अंगे शिकण्यासाठी सराव आवश्यक आहे. नाटकातील संवाद एकमेकांवर अवलंबून असतात. वाक्य आणि हालचाल यांचा समन्वय झाला पाहिजे. नाटकातील पात्र आणि विषय समजून घेऊन संवाद पाठांतर करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास महत्त्वाचा. असे अनेक नाटकातील बारकावे
याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका कविता वानखेडे, पर्यवेक्षिका स्वाती राऊत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता राहुल पवार यांनी तर आभार प्रदर्शन शितल सदामते यांनी केले.
नाट्य प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास
Date:

