आम आदमी पक्षाचा पाठपुरावा
पुणे:
दहा वर्षापूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी नांदेडसह शहरा लगतच्या ३४ गावत दगड खडी,क्रेसेटची वाहतूक व बांधकाम प्रकल्पामुळे रस्त्यासह लोकवस्त्या, सोसायट्यांत दररोज धुळीचे लोट पसरत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालवली आहे.याबाबत पालिकेच्या आरोग्य,पर्यावरण व बांधकाम प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही सुरू करावी अशी सूचना महाराष्ट्र प्रदुषण विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे यांनी दिल्या आहेत.
याबाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी प्रदुषण विकास महामंडळाचे लक्ष वेधले आहे.
दगड खाणींची वाहतूक व बांधकाम प्रकल्पामुळे शहरा सभोवतालच्या ३४ गावात धुळीचे कण, लोट पसरून हवेचे प्रदुषण वाढले आहेत. त्यामुळे रहिवासी, प्रवाशांना श्वसनाचे विकार तसेच इतर गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे . यास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी असल्याचे धनंजय बेनकर यांनी केली आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,बांधकाम प्रकल्प व खाणींचे दगड खडी क्रेसेटची वाहतूक करणाऱ्या वाहने ३४ गावातील रस्त्यांवर धूळीचे साम्राज्य पसरले आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे . नागरिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. जीवनमान खालावत चालले आहे.
या गावांतील फळबागांसह गार्डन, वृक्ष धुळीच्या लोटामुळे वाया चालली आहेत. अनेक वृक्ष पांढऱ्या धुळीने माखलेले आहेत तसेच शेतीतील भाजीपाला व इतर पिके धुळीमुळे वाया जात आहेत.वनविभागानेही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे धनंजय बेनकर यांनी सांगितले
हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभागाने २७ आॅक्टोबर २०२३ नियमावली केली आहे. त्यानुसार ३४ गावातील प्रदुषणाची पाहणी करून कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने दिल्या आहेत.
पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या हालगर्जीपणामुळे पालिकेत समावेश होऊनही ३४ गावातील प्रदुषणाची पातळी कमी होण्या ऐवजी वाढली आहे. नागरिक वस्त्यां लगत दगड खाणी आहेत तसेच उघड्यावर मोठ मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे धुळीचे लोट प्रचंड प्रमाणात पसरत आहेत. श्वसनाचे विकार होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत..
यास जबाबदार असलेल्या विभागावर कठोर कारवाई करुनहवेतील प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना सुरू कराव्यात दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना नोकरीतुन बडतर्फ करण्यात यावे अन्यथा तीव्र जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार पुणे शहर आम आदमी पक्षाने केला आहे.