प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणाराआगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोजसावंत दिग्दर्शित ‘लव्ह यु जिंदगी मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अनिरुध्दबाळकृष्ण दाते या एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेतील सचिन पिळगांवकर यांचे प्रमुख पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावरप्रदर्शित करण्यात आले होते. वय झाले असले तरी काय… आयुष्य आनंदाने जगण्याची इच्छा मनी बाळगणारा असा हाअनिरुध्द दाते. पण आयुष्यातील खरा आनंद म्हणजे तारुण्य मानणा-या अनिरुध्दाची तारुण्य पुन्हा एकदा उपभोगण्याचीइच्छा आणि पुन्हा यंग होण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हा अनिरुध्द दातेचा एकंदरित प्रवास म्हणजे ‘लव्ह यु जिंदगी’. अशाया हलक्या-फुलक्या, सुंदर आणि प्रेमळ चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार असतील हेजाणून घेण्याची इच्छा नक्की अनेकांची असेल.
‘ लव्ह यु जिंदगी’ मध्ये सचिन पिळगांवकरांसोबत आणखी एका प्रमुख भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याचीउत्सुकता सगळ्यांच्याच मनात होती आणि ही उत्सुकता लक्षात घेता नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवे-कोरे पोस्टरप्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. तर आपल्या हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थनाबेहरे या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नवीन पोस्टरच्या माध्यमातून याचित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आला आहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेकचित्रपटांतून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही देखील सकारात्मकप्रतिसाद दिला आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या भूमिकेची झलक आपल्याला लवकरच टीझरमधून दिसेल. पुन्हा एकदाप्रेक्षकांची चित्रपटाविषयी असलेली कुतुहलता लक्षात घेता या चित्रपटाचा टीझर लकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेचआणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नवीन आशय आणि नवीन विषय असलेल्या ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या निमित्तानेप्रार्थना बेहरे आणि सचिन पिळगांवकर पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरीनवीन, रंजक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातून सचिन पिळगांवकर यांनी साकारलेल्या अनिरुध्द दातेच्या आयुष्यातील गंमती जमती अनुभवायलामिळतील आणि त्याचसोबत प्रार्थनाचा पुन्हा एकदा नटखट स्वभाव देखील पाहायला मिळणार आहे. सचिन बामगुडे निर्मित‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरलाआयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.