आयुक्त साहेब इकडे लक्ष द्या हो …15 उत्तुंग,विशाल वृक्षांच्या जीवावर उठला , शेतकी विद्यापीठाचा  कारभार…

Date:

 
पुणे-शेतकी महाविद्यालये ..निसर्गाची जोपासना करायला शिकविणारी ,शेती शिकविणारी ,झाडी जोपासणारी …महाविद्यालये ,विद्यापीठे ..राहुरी कृषी विद्यापीठ हि त्यातले असेल असे वाटणे साहजिक आहे पण … पण या विद्यापीठाचा कारभार ..चक्क विशाल आणि उत्तुंग अशा 15 झाडांच्या जीवावर उठला आहे .आणि हा प्रकार उघड्या डोळ्याने पाहत ..आपापल्या कामधंद्याकडे निमुटपणे पुणेकर जातील असे विद्यापीठाला वाटले असेल तर नवलच म्हणायचे .
 कारण रवी नितनवरे आणि हरित परिवार ने या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे .आणि संताप व्यक्त केला आहे . मुळा रस्त्यावर बजाज गार्डन ते कोहिनूर इस्टेट दरम्यान हि बहुधा निलगिरीची विशालकाय झाडे आहेत . येथील आपल्या भूखंडाला सीमा भिंत घालायची म्हणून विद्यापीठाने झाडांचा जीव जाईल असा संतापजनक कारभार सुरु केला आहे .झाडांच्या लगतच त्यांनी सिमाभिंती साठी खोदाई चालू केली आहे . पावसाळा,कदाचित येणारे वादळ आणि एका बाजूने झाडांचा काढून घेतलेला भुई चा आधार यामुळे एक झाड काल उन्मळून पडले आहे . आणि बाकी 14 झाडे घटका मोजत बसले आहेत . आणि बहुसंख्य पुणेकर निमुटपणे पाहत आहेत .. पण येथील हरित परिवार या मित्र मंडळींच्या परिवाराने या विरुद्ध आवाज उठवायचा निर्धार केला आहे .तातडीने विद्यापीठाचा हा खुदाई कारभार थांबवावा , आणि केलेली खुदाई पुन्हा पूर्ववत करून झाडांना आधार द्यावा या साठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.आता पडलेले झाड सुदैवाने रस्त्यावर पडले नाही …अन्यथा जीवित हानीझाली असती … आणि अशी जीवित हानी झाल्यावर नंतर मग जागे व्हायचे  काय ? या मोठ मोठ्या विशाल झाडांचा असा बळी जाऊ द्यायचा काय ? असा सवाल त्यांनी केला आहे .आणि पुणे महापालिका आयुक्त सौरव राव यांनी तातडीने लक्ष घालून या बाबत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...