पुणे : पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरवात झाली मात्र, मोर्चा पुढे नेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले ..पुण्यात आज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा येथून ओबीसी मोर्चाची सुरवात होणार होती. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, कॉंग्रेसच्या दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी चे नगरसेवक योगेश ससाणे यांच्या सह असंख्य मान्यवर कार्यकर्ते,नेते येथे सहभागी झाले होते.. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मोर्चांना परवानगी नसल्याने पुणे पोलिसांनी शनिवारवाडा येथून मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली.दरम्यान समीर भुजबळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.आणि त्यांच्या समवेत कॉग्रेसच्या माजी आमदार ,माजी महापौर दीप्ती चवधरी आणि असंख्य पुरुष महिला कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत घालून नेले.
ओबीसी आंदोलनाचं पहा पुण्यात काय झालं,कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच पोलीसांनी गाडीत घालून नेलं
Date:

