पुणे, दि. २५ जून २०२२: महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब लोणीकंद ४००/२२०/२२ केव्ही उपकेंद्रात तातडीचे अत्यावश्यक दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने रविवारी (दि. २६) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी व इतर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या अतिउच्चदाब लोणीकंद ४००/२२०/२२ केव्ही उपकेंद्रामध्ये अत्यावश्यक तांत्रिक दुरुस्तीचे काम करणे तातडीचे असल्याने रविवारी (दि. २६) ते करण्यात येत आहे. या दुरुस्ती कामामुळे महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या एकूण ६ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी, संघर वेअर हाऊस व इतर परिसर, तुळापूर, भावडी, जगताप वस्ती, बायफ रोड, लोहगाव रस्ता, आवलवाडी रस्ता, साई सत्यम पार्क, उबले नगर परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.