सेवाव्रती कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी दीर्घकालीन योजना आवश्यक- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Date:


पुणे, ता. ६ – स्वत:च्या जीवावर उदार होऊन समाजासाठी कर्तव्य भावनेने अविरत कार्य करणार्या सेवाव्रती कर्मचार्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने दीर्घकालिन योजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
हेमंत रासने मित्र परिवाराच्या वतीने दोन हजार स्वच्छता कर्मचारी आणि चारशे वर्तमानपत्र वितरकांच्या कृतज्ञता सन्मान कार्यक्रमात पाटील बोलत होते. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आमदार मुक्ता टिळक, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, मृणाल रासने, प्रमोद कोंढरे, उदय लेले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
पाटील म्हणाले, प्रासंगिक कार्यक्रमांतून आपण विविध वंचित घटकांना मदत करीत असतो. बेताच्या पगारामुळे त्यांना घर चालविणे अवघड असते. या कुटुंबांचा अभ्यास करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठांना मदत, मूलभूत सुविधा भागविण्यासाठी कायमस्वरूपी योजना केली पाहिजे. त्यांचा आर्थिक भार कमी झाला तर ते ही आर्थिक बचत करू शकतील. त्यासाठी सरकारबरोबर विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे.
रासने म्हणाले, शहरामध्ये दररोज सतराशे मेट्रिक टन कचर्याचे संकलन दहा हजारहून अधिक स्वच्छता कर्मचारी करीत असतात. कोविडच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि कुटुंबाच्या आरोग्याची तमा न बाळगता या कर्मचार्यांनी सामाजिक भावनेतून सेवाभावी वृत्तीने समाजाची सेवा केली. तशाच प्रकारचे काम वृत्तपत्र वितरकांनी घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवून केले. पुणेकरांच्या वतीने या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील शेवटचा माणूस सुखी होण्यासाठी अन्न, सुरक्षा, आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हेमंत रासने यांनी प्रास्ताविक, प्रमोद कोंढरे यांनी सूत्रसंचालन आणि राजेंद्र काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. अनिल बेलकर, सौरभ रायकर, विनायक रासणे, किरण जगदाळे, नीलेश कदम, परेश मेहेंदळे, छगन बुलाखे, अश्विनी पांडे, अमित कंक यांनी संयोजन केले.   
*चौकट*
डॉक्टर, नर्स, सरकारी कर्मचारी, पोलीस, बॅंक कर्मचारी, दुकानदार आदी दहा समाज घटकांनी कोरोना काळात काम केले नसते तर समाज उद्धस्त झाला असता. या घटकांनी खर्या अर्थाने समाजाला वाचवले आणि आपण कोविडमधून बाहेर पडलो. दोन लसीकरणांमुळे समाजाच्या मनातील कोविडची भीती संपली. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांनी कणखरपणा दाखवला त्यामुळे आपण लस निर्मिती करू शकलो. नुसती लस निर्माण केली नाही तर ६० देशांना लसीचे डोस पुरविण्याची स्थिती निर्माण केली. असे मत ही पाटील यांनी व्यक्त केले.
*दिवाळी फराळाला सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्या. महापालिकेची आगामी निवडणूक, प्रभाग रचना, आरक्षण, निवडणुका वेळेवर होतील का, प्रचाराची रणनीती, निवडणुकीची तयारी या विषयांवर चर्चा झाल्या. कोरानानंतरची स्थिती, बाजारपेठेतील उलाठाल, या पुढील आव्हाने यावर मते व्यक्त करण्यात आली. एकमेकांची आपुलकीने विचारपूस करण्यात येत होती.
खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, माजी मंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, दीपक मानकर, अभय छाजेड, आबा बागूल, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, डॉ. सतीश देसाई, लता राजगुरू, पृथ्वीराज सुतार, विशाल धनावडे, अर्चना पाटील, राहूल भंडारे, भीमराव साठ्ये, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, व्यापारी असोसिएशन महेंद्र पितळिया, केमिस्ट असोसिएशनचे संजय शाह, चेतन शाह, संजय कुंजीर, ॲड प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित, तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे राजेश बारणे यांच्यासह सामाजिक, राजकीय, व्यापार, सहकार, प्रशासन, आरोग्य, पत्रकारिता, गणेश मंडळे आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयसीआयसीआय बँकेची पुण्यात कॉर्पोरेट इकोसिस्टम शाखा

·         येथे 24x7 एटीएम सुविधेची सोय आहे. ·         कॉर्पोरेट इकोसिस्टीमसाठी बँकिंग सेवांची विस्तृत श्रेणी...

बाणेरमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हस्ते ‘कल्याण ज्वेलर्स’च्या नवीन दालनाचे उद्घाटन!

पुणे-बाणेर:  भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज पुणे, महाराष्ट्र येथील बाणेर मेन रोडवरील गणराज चौक येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या भागातील ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करणे हे या शोरूमचे उद्दिष्ट आहे. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट डिझाइन्स उपलब्ध आहेत, जसे की, मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने) इत्यादी अनेक लोकप्रिय इन-हाऊस ब्रँड्स याठिकाणी उपलब्ध आहेत. शाही थाट आणि डिझाइन्सचा खजिना असलेले हे बाणेरमधील नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करेल. यावेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाल्या, "कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन दालनाचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-निष्ठेला महत्त्व देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. मला खात्री आहे की, इथले दर्जेदार दागिने आणि उत्कृष्ट सेवा ग्राहकांच्या मनाला नक्कीच भुरळ घालतील!" नवीन शोरूमच्या उदघाटनाबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, "बाणेरमध्ये हे नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे, दागिन्यांच्या खरेदीचे एक परिपूर्ण केंद्र ठरावे अशी आमची इच्छा आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणात आणि सेवेतून एक उन्नत अनुभव देण्याची आमची वचनबद्धता कायम आहे, आणि तरीही आम्ही कल्याण ज्वेलर्सच्या विश्वास व पारदर्शकतेच्या चिरंतन मूल्यांशी घट्ट जोडलेले आहोत." या नवीन शुभारंभाच्या निमित्ताने, कल्याण ज्वेलर्सने स्टोअरमध्ये अनेक खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. साध्या सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर (Value Addition) प्रति ग्रॅम ७५० रुपये फ्लॅट सवलत, प्रीमियम आणि जडाव (Studded) दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १५०० रुपये फ्लॅट सवलत, तर टेम्पल आणि अँटिक दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १००० रुपये फ्लॅट सवलत देण्यात येत आहे. याशिवाय, 'कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट' देखील लागू असेल, जो बाजारपेठेतील सर्वात कमी दर असून सर्व शोरूम्समध्ये एकसमान आहे. हे सर्व फायदे केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत. कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा 'बीआयएस' (BIS) हॉलमार्क असलेला असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना ब्रँडचे सिग्नेचर '४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र' (4-Level Assurance Certificate) मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल (Free lifetime maintenance), उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते. या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय 'हाऊस ब्रँड्स' देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.

‘अंमली पदार्थांमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली ३० दिवसांची मोहीम सुरू

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत...