Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गिरीश बापट हेचं पुण्यातून भाजप चे अधिकृत उमेदवार..बारामतीतून कांचन राहुल कुल ..

Date:

नवी दिल्ली:  ‘माय मराठी ‘ च्या पूर्वीच्याच वृत्तानुसार भाजपने पुण्यातून गिरीश बापट यांचीच अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे .रात्री पावणेदोन वाजता  हि उमेदवारी जाहीर होताच विशेष म्हणजे बापट,उदय जोशी,दीपक पोटे आणि मीडियातील मंडळी अडीच वाजता गिरीजा कट्ट्यावर पोहोचली ….आणि उमेदवारीचे स्वागत केले.तर सकाळी त्यांच्या घरी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी स्वागत अभिनंदनासाठी गर्दी केली .

भाजप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीतून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आज रात्री उशिरा ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील सहा उमदेवारांचा समावेश आहे. भाजपने पुण्यातून गिरीश बापट, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तर बारामतीतून रासपच्या कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल
बारामतीतून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.भाजप ही जागा स्वत: लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देवून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत कांचन कुल यांच्योसोबत होणार आहे. मागच्यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती.

काँग्रेसच्या यादीत टावरे, सुभाष झांबड
काँग्रेसनेही ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिलिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राज बब्बर आणि संबित पात्रांना उमेदवारी

काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना फत्तेहपूर सिक्रीमधून तर रेणुका चौधरी यांना तेलंगणाच्या खम्मममधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने संबित पात्रा यांना ओडिशाच्या पुरीमधून उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावे सेना नेते सुभाष देसाई यांनी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देऊन रविंद्र गायकवाड यांचा पत्ता शिवसेनेने कट केला आहे.  पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे.उस्मानाबाद मतदार संघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डच्चू देण्यात आला असून या जागेवरून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्याबाबत स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. याचा फटका गायकवाड यांना बसल्याचे बोलले जात आहे. त्याच प्रमाणे हिंगोली मतदार संघातून हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने प्रलंबित राहिलेली पालघरची जागा भारतीय जनता पक्षाकडून मागून घेतली आहे. या जागेवरील उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी इथून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे साताऱ्याच्या जागेवरून भाजपतर्फे लढण्याच्या तयारीत होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे आल्याने पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जागेवरून इच्छूक असललेले पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. 

लोकसभा निवडणूक २०१९ साठी युती व आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी

संघ.क्र. मतदारसंघ भाजप-सेना युतीचे उमेदवार राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार
1 नंदुरबार (अ.ज.) हीना गावित (भाजप) के. सी. पडवी (काँग्रेस)
2 धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
4 रावेर रक्षा खडसे (भाजप)
5 बुलढाणा प्रतापराव जाधव (शिवसेना) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
6 अकोला संजय धोत्रे (भाजप)
7 अमरावती (अ.जा.) आनंदराव अडसूळ (शिवसेना)
8 वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)
9 रामटेक (अ.जा.) कृपाल तुमाणे (शिवसेना)
10 नागपूर नितीन गडकरी (भाजप) नाना पटोले (काँग्रेस)
12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) अशोक नेते (भाजप) डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)
13 चंद्रपूर हंसराज अहिर (भाजप) विनायक बांगडे
14 यवतमाळ-वाशिम भावना गवळी (शिवसेना) माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
15 हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)
17 परभणी संजय जाधव (शिवसेना) राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
18 जालना रावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे
19 औरंगाबाद चंद्रकांत खैरे (शिवसेना)

सुभाष झांबड

21 नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना) समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
23 भिवंडी कपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे
24 कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना) बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
25 ठाणे राजन विचारे (शिवसेना) आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
26 उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी (भाजप)
27 उत्तर पश्चिम मुंबई गजानन किर्तीकर (शिवसेना)
29 उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस)
30 दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे (शिवसेना) एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
31 दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना) मिलिंद देवरा (काँग्रेस)
32 रायगड अनंत गीते (शिवसेना) सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
33 मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना) पार्थ पवार (राष्ट्रवादी)
36 शिरुर शिवाजीराव आढळराव (शिवसेना) डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
37 अहमदनगर सुजय विखे पाटील (भाजप)
38 शिर्डी (अ.जा.) सदाशिव लोखंडे (शिवसेना) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
39 बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
40 उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)  राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
41 लातूर (अ.जा.) सुधाकरराव शिंगारे (भाजप) मच्छिंद्र कामत
44 सांगली संजयकाका पाटील (भाजप)
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना) नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)
47 कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना) धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
48 हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना) राजू शेट्टी स्वभिमानी संघटना (राष्ट्रवादी)
3 जळगाव स्मिता उदय वाघ गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
11 भंडारा-गोंदिया
16 नांदेड प्रताप चिखलीकर
20 दिंडोरी (अ.ज.) भारती पवार धनराज महाले (राष्ट्रवादी)
22 पालघर (अ.ज.)
28 उत्तर पूर्व मुंबई संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
34 पुणे गिरीश बापट
35 बारामती कांचन राहुल कुल सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
42 सोलापूर (अ.जा.) सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
43 माढा  संजय शिंदे (राष्ट्रवादी)
45 सातारा छत्रपती उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...