पुणे, दि. १७ डिसेंबर २०२१: महावितरणच्या पुणे परिमंडलामधील १ कोटी ६९ लाख ५१ हजार ९४१ रुपयांच्या थकीत वीजबिलासंबंधी न्यायप्रविष्ट असलेली २८५ प्रकरणे नुकत्याच झालेल्या येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आहेत. तडजोडीअखेर ही सर्व रक्कम संबंधीत ग्राहकांकडून भरण्यात येत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील थकती वीजबिलाबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये गणेशखिंड मंडलमधील सर्वाधिक ८४ लाख ७७ हजार २५० रुपयांची १६१ प्रकरणे, रास्तापेठ मंडलमधील ८४ लाख ७४ हजार ६९१ रुपयांची १२४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या कामकाजामध्ये महावितरणकडून विधी सल्लागार सत्यजित पवार, सहायक विधी अधिकारी ज्योत्स्ना सोनोने, समीर चव्हाण, कनिष्ठ विधी अधिकारी गणेश सातपुते तसेच अभियंता, अधिकारी, वित्त व लेखा विभागातील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

