पुणे :- गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्यावतीने ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयर्नमॅन नावाजलेल्या ट्रायथलॉनपटू विश्वकांत उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर पाचवी ते आठवीच्या मुलांनी पथसंचलन केले.यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रगीत गायले.याशिवाय शिस्त आणि ऐक्य यांचे महत्त्व दर्शविण्यासाठी पिरॅमिड तयार करण्याच्या मुलांच्या उत्साहाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने कौतुक केले.
गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्यध्यापिका भारती भागवाणी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ट्रायथलॉनपटू विश्वकांत उपाध्याय यावेळी उपस्थित होते.
उपाध्याय म्हणाले की ,’आरोग्यम् धनसंपदा’ हे ब्रीद वाक्य नेहमी आपण ऐकत असतो.म्हणूनच आपले शरीर ही आपली मौलिक संपत्ती आहे.तिची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करणे,आहार सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे.यासाठी शालेय जीवनापासुनच या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले नसेल तर त्याची वाढ व विकास चांगला होत नाही.विद्यार्थ्याच्या अंगी असणा-या प्रचंड ऊर्जेला विविध खेळातुन वाव देणे आजच्या काळात गरजेचे आहे.
प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे.असे मत सोनू गुप्ता यांनी मांडले.