पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पुणे :- पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट कर्नल गौरव छिब्बर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी’चाणाक्य’ यांची अखंड भारत ही संकल्पना सर्वांसमोर मांडली. याचसोबत सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरींग येथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहणारे लेफ्टनंट कर्नल गौरव छिब्बर, मुख्याध्यापिका भारती भागवाणी,इतर शिक्षकही उपस्थित होते.
यावेळी छिब्बर म्हणाले कि, शत्रूचे आक्रमण असो व देशावर आलेली नैसर्गिक संपत्ती कोणत्याही आपत्तीशी लढण्यासाठी देशाची सेना कायमच तत्पर असते.तरुणांनी देखील हा आदर्श घेऊन देशसेवेसाठी तत्पर असले पाहिजे. वर्णभेद,जातिभेद, स्त्री- पुरुष असमानता असे प्रश्न जेव्हा खऱ्या अर्थाने समाजातून नष्ट होतील त्यानंतरच देश खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल.
भारती भागवाणी म्हणाल्या कि,भारताला जगातील सर्वात यशस्वी देश बनविण्यासाठी देशाच्या नेतृत्वासोबत देशाच्या युवा पिढीने एकत्र येवून देशाची सर्वसमावेशक प्रगती साधण्यात सक्रियतेने प्रयत्न केले पाहिजेत.
येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची माहितीही या निमित्ताने त्यांनी सांगितली. याशिवाय दिवसरात्र आपले संरक्षण करणारे आपले जवान आणि अनेक कष्ट सोसून आपल्यासाठी पीक काढणारे शेतकरी यांच्या कष्टाची जाणीव होणे किती आवश्यक आहे. याची माहिती देखील त्यांनी सांगितली.