पुणे :- टाळ मृदुंगाचा गजर आणि ‘माऊली माऊली’ चा जयघोषात गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मधील २५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा नारा दिला. तसेच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन,प्लास्टिक बंदी याबद्दलही जनजागृती केली.खाद्यपदार्थांच्या दुकानांजवळील कचरा गोळा केला.वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात देखील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. मागच्या ४ वर्षापासून वारीच्या काळात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचे ९वी ते १२वीचे विद्यार्थी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासोबत काम करून वारीतील प्रत्येक वारकऱ्याला वारीत स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वाटावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. यावेळी देखील विद्यार्थी उत्साहात यात सहभागी झाले .
मोठया आनंदमयी भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात सहभागी झाले यावेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवाणी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
वारीच्या या सुंदर यात्रेच्या आठवणी सतत आपल्या स्मरणात राहण्यासाठी ऑडियो आणि व्हीडीओ डॉक्युमेंटरी करण्याच्या उद्देशाने वारीमधील काही चित्रफिती, छायाचित्र तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मुलाखती विद्यार्थ्यांनी घेतल्या.सोनू गुप्ता म्हणाल्या कि, वारीची परंपरा फक्त एकमेकांना जोडत नाही तर ती आपल्या मुळांना एकत्र ठेवते. वारी मधून माणुसकीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडत असते हा अनुभव येणाऱ्या पिढीने घ्यावा या हाच या उपक्रमागचा हेतू आहे.