पुणे :- लहान वयात विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी देत जर या विषयांची गोडी लावली, तर त्यातून पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ तयार होऊ शकतात.अशी भावना माहिती गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी दिली
त्या पुढे म्हणाल्या कि, आजच्या विज्ञान दिनाचे औचित्याने लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतुहल वाढावे व त्यांना त्या वयापासूनच या विषयांची गोडी लागावी या उद्देशाने गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने बावधन मधील गंगा लेजंड येथे जीजीआयएस अथ(प्री प्रायमरी स्कूल) मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
आजही विज्ञान आणि पर्यावरण विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी लहान मुलांना समजेल आणि त्यांना करून पाहता येईल,अशा प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान शिकवण्याचे प्रयत्न अजून कमीच पडतात.म्हणूनच यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी वेगवेगळे प्रयोग सादर केले.
आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या जसे कि, कचऱ्याचे विघटन कसे होते ,जलशुद्धिकरण कसे होते, ढग कसे तयार होतात,गुरुत्वाकर्षण काय असते अशा काही गोष्टींची माहिती शिक्षकांनी चिमुकल्यांना दिली. या प्रदर्शनामध्ये पालकांनी देखील मुलांसोबत सहभाग घेतला.
भारती भागवाणी म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचा वापर करून समस्या कशा सोडवायला शिकावे ज्यामुळे येणाऱ्या २१ व्या शतकातील वेगवान जगाला सामोरे जाण्यासाठी ते स्वत:ला तयार करू शकतात.