‘आय पेरेंट्स’ सत्रांअंतर्गत सायली गोडबोले यांचा पालकांशी संवाद
पुणे:-माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जिजाबाई राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंनी महाराजांना खऱ्या अर्थाने मातृभूमीसाठी,स्वराज्यासाठी जगायला शिकवले. त्याचबरोबर कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करण्याची बहुमोल शिकवणही त्यांनी दिली. अशीच शिकवण आपण आपल्या येणाऱ्या पिढीयांना देणे आवशयक आहे.असे मत लेखिका सायली गोडबोले-जोशी यांनी व्यक्त केले.
बावधन मधील गंगा लेजंड येथे गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने जीजीआयएस अथ अंतर्गत ‘आय पेरेंट्स’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या कि, मनात सकारात्मकता, खंबीरता,धौर्यशीलता असे गुण अंगीकारल्यास अशक्य असे काही नाही.जिजाऊप्रमाणे आपल्या मुलांमध्ये परोपकार,आत्मविश्वास, शौर्य, न्याय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असते. प्रत्येक स्त्रीने आपली शक्ती ओळखून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
यावेळी बावधन मधील जीजीआयएस अथ शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता सोमा तसेच समस्त शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.