मद्यविक्रीची दुकाने होम डिलिव्हरी साठी सोमवार ते शुक्रवार सुरु (सकाळी ७ ते ६ )-पुण्यात नवा आदेश

Date:

पुणे – राज्यात करोनाची दुसरी लाट सुरु असून राज्य सरकारकडून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून पुणे शहरासाठी नियमावली जाहीर करून कडक अंमलबजावणी सुरु आहे. अशातच आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. या नुसार मद्यविक्रीची दुकाने पार्सल सुविधा देण्यासाठी सोमवार पासून सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सुरु राहणार आहेत . जाणून घ्या सुधारित आदेश…

  • – सर्व ऑक्सिजन प्रोड्यूसर कंपन्यांनी 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. त्यांनी ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे यांची यादी प्रसिद्ध करावी.
  • – पुणे महानगरपालिक क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना परवानगी दिलेली आहे अशा कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरु ठेवता येतील. त्यांना इतर किरकोळ विक्री करता येणार नाही. त्यांनी Point to Point विक्री करावी.
  • – खालील आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना कोविड 19 चाचणी करणेपासून सूट देण्यात येत आहे.
  • ई-काॅमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी.
  • हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट यांचे कर्मचारी तसेच त्यांचे मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी.
  • खासगी वाहतूक करणारे वाहन चालक \ मालक.
  • दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीन मासिके, साप्ताहिक इ. ची छपाई व वितरण करणारे कर्मचारी.
  • घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस\नर्स.
  • तथापी त्यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
  • – पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील.
  • – चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • – संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश \ मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
  • – पुणे महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश \ मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...