भिलवाडा (राजस्थान)-राजस्थानच्या जयपूर-कोटा महामार्गावरून मंगळवारी रात्री सिलेंडरने भरलेले ट्रक जात असताना त्यावर अचानक वीज कोसळली. यानंतर तब्बल अडीच तास एकानंतर एक स्फोट घडतच राहिले. या घटनेमुळे अख्खे हायवे 15 तासांसाठी बंद करावे लागेल. स्फोट इतके भयंकर होते की लोखंडी टाक्यांचे तुकडे हवेत उडून 1-1 किमी पर्यंत दूरवर गेले. सुरक्षिततेसाठी सकाळी कोटा, अजमेर आणि जयपूर या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना थांबवण्यात आले. त्या सर्वांना जहाजपूर आणि बसोली मार्गे निघावे लागले.घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोलावण्यात आले. यानंतर आसपासच्या परिसरात उडालेल्या लोखंडी टाक्यांचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू झाले. या घटनेत चालक जखमी असून त्याला स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेनंतर सुरू झालेल्या साखळी स्फोटांमध्ये भीषण आग लागली. या आगीचा भडका तब्बल 5-7 किलोमीटर पासूनही दिसत होता. घटनेच्या सुरुवातीलाच प्रशासनाला याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. पण, साखळी स्फोटांमुळे कुणाचीही जवळ जाऊन पाहणी करण्याची हिंमत झाली नाही.स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग मंगळवारी रात्री 8 वाजता कोसळलेल्या वीजेमुळे लागली होती. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. गॅसच्या टाक्यांचे साखळी स्फोट सुरू झाले. या घटनेमुळे गावात सुद्धा भीतीचे वातावरण पसरले होते. काही सिलेंडरचे तुकडे तर काहींच्या छतावर सुद्धा येऊन पडले. स्थानिक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, आग इतकी भीषण होती की 150 मीटर दूर थांबणे सुद्धा कठीण होते.
LPG गॅसच्या टाक्यांनी भरलेल्या ट्रकवर वीज कोसळली, अडीच तास सुरूच होते स्फोटांवर स्फोट
Date:

