मुंबई, १ नोव्हेंबर: लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी ९ दिवस ७ तास व ५ मिनिटे या कालावधीमध्ये गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत देशभरात सायकलवरून प्रवास करत त्यांचा तिसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला. या प्रवासादरम्यान त्यांनी अवघड प्रदेशांमधून जवळपास ३८०० किमी अंतर पार करत नवीन रेकॉर्ड स्थापित केला. हा रेकॉर्ड १९७१ भारत-पाक युद्धामध्ये भारतीय लष्करी सेनेने मिळवलेल्या विजयाच्या ५०व्या वर्धापन दिनाच्या साजरीकरणाचा भाग होता. यंदाचे वर्ष कर्तव्यादरम्यान शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानाप्रती ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे.
लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू एआयटी पुणे येथून पदवीधर आहेत आणि भारतीय सेनेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मेकॅनिकल इंजीनिअर (ईएमई) अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. त्यांना सायकलिंगची आवड आहे आणि सर्वात गतीशील सोलो सायकलिंगमध्ये दोन सलग वर्ल्ड रेकॉर्डस् स्थापित केले आहेत. अल्ट्रा-सायकलिंग इव्हेण्टमधील त्यांची तिसरी मोहिम म्हणून यंदा ते १९७१ मधील पाकिस्तानविरोधातील विजयाच्या स्मरणार्थ भारतीय सेनेशी संलग्न झाले आणि फक्त ९ दिवसांमध्ये सायकलवरून भारताच्या पश्चिम ते पूर्व भागापर्यंत ३,८०० किमी अंतर पार केले.
‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरीकरणात संरक्षण दल, मंत्री, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा विशेष सहभाग दिसून आला. देशातील तरुणांना प्रेरणा देणे आणि देशासाठी प्राण अर्पण करणा-या आपल्या सैनिकांबद्दल अभिमान जागृत करणे, त्यांना वीरता व बलिदानाच्या कर्तव्यांबद्दल शिक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणा-या भारतीय लष्कराच्या जवानांप्रती वारसा, उपलब्धी, संघर्ष, निःस्वार्थ त्याग आणि समर्पितता दाखवा. आणि आपला १९७१ चा विजय, बांग्लादेशचे स्वातंत्र्य आणि भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांना साजरे करा.
उडचलो या ग्राहक तंत्रज्ञान कंपनीचा नेहमी सशस्त्र दलाला पाठिंबा राहिला आहे. ही कंपनी थोर कार्याप्रती पाठिंबा मिळवण्यासाठी ‘सर्व्हिंग दि सर्विसेस’ या एकमेव ध्येयासह कार्यरत आहे. कंपनीने लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांना हे यश संपादित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याचा पुरवठा केला आहे.
या रेकॉर्डबाबत बोलताना उडचलोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, ”आम्हाला लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांच्याशी संलग्न असल्याने सन्माननीय वाटते. लक्ष केंद्रित करून संपादित केलेल्या यशाप्रती प्रबळ निर्धार, तसेच आवड व सातत्यपूर्ण चिकाटीमुळे कार्य नियुक्त वेळेमध्ये पूर्ण करत इच्छित यश मिळण्याची खात्री मिळाली आहे. तसेच अपेक्षित यश मिळवण्यासाठी अनेक महिने व वर्षांपासून घेतलेल्या अथक मेहनतीमधून स्थिरता, महत्त्वाकांक्षा व आत्म-नियंत्रण दिसून येते. आम्ही या आवडीला सलाम करतो आणि हे गुण आमचे मिशन व मूल्यांशी प्रबळपणे संलग्न आहेत.”
रेकॉर्ड संपादित करण्याबात लेफ्टनंट कर्नल पन्नू म्हणाले, ”सायकलिंग स्वातंत्र्याची भावना देण्यासोबत मनासाठी अत्यंत सुखद आहे. मला सशस्त्र सेना आणि भारतीय सेनेचा भाग असण्याचा अभिमान वाटतो, ज्यामुळे मला नेहमीच झेप घेण्याची आणि अशक्य गोष्टींना आव्हान करत गिनीज बुक ऑफ रेकार्डसमध्ये स्थान मिळवण्याची प्रेरणा मिळाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यासाठी समर्पिततेसोबत स्मार्ट असण्याची आणि विजयाबाबत सुस्पष्ट धोरण असण्याची देखील गरज असते.”
या प्रवासाला १७ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री १२.१७ वाजता कोटेश्वर, गुजरात येथून सुरूवात झाली आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २.१८ वाजता किबिठू, अरूणाचल प्रदेश येथे समापन झाले. टीम जयपूर, आग्रा, लखनौ, गोरखपूर, सिलिगुडी व तेजपूर येथील तरूणांशी संलग्न झाले. प्रतिकूल हवामान स्थिती आणि रहदारी, रस्ते अडथळे असे मानवनिर्मित अडथळे असताना देखील प्रवासावर काहीच परिणाम झाला नाही आणि देशभरातील तरूणांना मोठा संदेश देण्यात आला. टीममध्ये न्यूट्रिशनिस्ट, नेव्हिगेटर, बाइक मेकॅनिक, फिजियोथेरपीस्टसह ६ सदस्यांचा समावेश होता.

