ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू – संजय राऊत

Date:

अलिबाग-महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे, पण शिवसेना जागेवरच असून बंडखोर वाॅकरवर चालत आहेत. शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम शिवसेना करेल. शिंदे गट गुवाहाटीत कैदी आणि गुलाम बनून राहत असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी आज केला. ते अलिबाग येथील शिवसेना मेळाव्यात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, मला आनंद वाटला की, कोणीतरी माझा उल्लेख अलीबागचा सूपूत्र म्हणून केला. माझा जन्म इकडलाच, शाळाही इकडलाच आहे.

शिंदे गट जेलमध्ये बसला

राऊत म्हणाले, आमदार महेंद्र याना मी काॅल केला कुठे आहात. ते म्हणाले की, माझ्या पायाचे ऑपरेशन झाले आणि मी आराम करायला आलो त्यानंतर त्यांनी काॅल कट केला. ते गुवाहाटीला आराम करायला गेले, काय ते डोंगार, काय ती झाडी, काय तो हाटील असे म्हणतात पण ते रॅडीसन ब्ल्युमधील जेलमध्ये बसले महाराष्ट्रात त्यांची येण्याची हिंमत नाही.

अटक करा पण…

राऊत म्हणाले, कितीही प्रयत्न करा अटक करून घेईल, पण गुवाहाटीला जाणार नाही. शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे, पण शिवसेना संपणार नाही. छप्पन वर्षांपासून शिवसेना उभी आहे. तेव्हापासून 260 सेना आल्या पण त्यात केवळ दोनच सेना ठिकून राहील्या त्या भारतीय सेना आणि दूसरी शिवसेना आहे.

आता फटके खाण्याची वेळ

राऊत म्हणाले, दिघेंसाठी पन्नास फटके खाल्ले आता फटके देण्याची वेळ आली. जनसागर उसळला तर काय होईल हे सांगायला नको. ते लपून बसले आहेत त्यांच्यात हिमंत नाही. पळपुट्यांसाठी केंद्राची सूरक्षा आहे. त्यांना मिल्ट्रीची सूरक्षाही दिली तर आश्चर्य वाटणार नाही.

लालसेने ते शिवसेनेत आले

राऊत म्हणाले, अब्दुल सत्तार म्हणतात की, हिंदुत्व धोक्यात आले म्हणून गेलो हे जरा आश्चर्यच आहे. गेलेल्या बंडखोरांपैकी 22 आमदार राष्ट्रवादीतून आले आणि तेच पवारांना शिव्या घालीत आहेत. शिवसेनेच्या सत्तेत मंत्रीपद मिळेल म्हणून आमच्यात आले आणि पळून गेले.

आत्ताच दिघे का आठवले?

राऊत म्हणाले, महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खूपसला त्यांचे वाटोळे झाले हा इतिहास आहे. गद्दारांना क्षमा नाही हे आनंद दिघेंचे वाक्य आहे. इतके वर्षे ते आठवले नाहीत, माणसे विकत घेताना आनंद दिघे आठवले नाही आताच का आठवत आहेत. इडीपासून सूटका करून घ्यायची आहे म्हणून त्यांचे असले कारस्थान आहे.

देशाच्या डोळ्यात अश्रू होते

राऊत म्हणाले, ज्या दिवशी सायंकाळी शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा महाराष्ट्राच्या डोळ्यातच नव्हे तर देशाच्या डोळ्यात अश्रू होते. देशातील संयमी नेता सरकार चालवू शकेल हे देशातील मोठ्या नेत्यांना वाटले ते त्यांनी सार्थ ठरविले.

भाजपने शब्द फिरवला

अमित शहा यांनी मातोश्रीवर येत दिलेला शब्द फिरवला. त्यांनी त्यावेळी हा निर्णय मान्य केला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते पण भाजपनेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिले नाही त्यांच्याच साथीला आज ते जाऊन बसले असेही राऊत म्हणाले.

शिंदे गट गुलामी करतोय

चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात यायला हवे पण त्यांची हिंमतच नाही, ते निर्णय घेऊ शकत नाही. मर्जीने ते हिंडू फिरू शकत नाही. ते कैदी म्हणून राहत आहे. भाजपचे गुलाम बनून गुवाहाटीला ते राहत आहेत.

रायगडच्या मातीत निष्ठेचे पीक

महाराष्ट्र पंचवीस वर्षे लढला पण औरंगजेबाला ते शरण गेले नाही. हा छत्रपती शिवराय आणि रायगड झुकला नाही. रायगडच्या मातीत निष्ठेचे आणि शुरांचे पीक आहे म्हणून छत्रपतींनी शुरांची ही माती निवडली असेही राऊत म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...