मुंबई, दि. १५ ऑगस्ट- येत्या काळात आपण ‘पाच संकल्पावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण करताना केले आहे. यामध्ये पहिले – विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे – गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे – आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे – एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे – नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल. त्यानुसार आगामी काळात पंतप्रधान यांच्या पाच प्रमुख संकल्पाचा अवलंब करण्याचे आवाहन भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी नागरिकांना केला.
७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज आपल्या दहिसर येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी रथाचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, रश्मी भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष अमित उत्तेकर, कृष्णा दरेकर, माधुरी रावराणे, अमोल खरात, वॉर्ड अध्यक्ष संजय घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज येथे ठाकूर व्हिलेज कल्चर आणि स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित भव्य तिरंगा यात्रेत भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर सहभागी झाले. यावेळी झेंडावंदन करण्यात आले. या तिरंगा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी आमदार रमेश सिंग ठाकूर, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मोहिते, निशा परुळेकर, राहुल तांगडी, लक्की यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ज्या पध्दतीने अभिप्रेत होता. तो भव्य दिव्य उत्सव ठाकूर व्हिलेज येथे पार पडला आहे. देशामध्ये आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात आजादीचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. तसेच देशामध्ये असे एकही घर नाही ज्या ठिकाणी तिरंगा फडकला नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला देशवासियांनी प्रतिसाद देत हर घर तिरंगा हे अभियान दमदारपणे यशस्वी झाले. असे भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ची घोषणा आज लाल किल्ल्यावरून केली आहे. या घोषणेचा सर्व नागरिकांनी अवलंब करुया असे आवाहनही भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.