(अनधिकृत बांधकामे,दंड आकारून नियमित करण्याच्या मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर आयुष्यभर नियम -कायदे पाळूनच पुढे जायचे या तत्वाने आचरण ठेवलेल्या एका वृध्द दाम्पत्याची एक प्रतिक्रिया इथे देत आहोत )
कायदा पाळून कुठे घर बांधता येते काय ? आणि ऐका हो …सर्वच इमारती बेकायदा आहेत .. पुढे मागे होतात कायदेशीर … एवढी लोकं राहत आहेत बेकायदेशीर घरात …तुम्हीच काय कायदेशीर रीतसर ..नियम पाळलेत काय ? विचारणा करता आहात ? असे वागाल तर कधीच तुमचे घर होणार नाही ….
——– कानावर पडलेली कधी काळची ती वाक्ये सारखी आक्रंदन करीत होती .
आणि हो खरे झाले ही तेच … माझे घर झालेच नाही .. सगळीकडेच कायदे तुडविलेले….. मी अडकलो नियमा च्या तत्वाच्या चौकटीत आणि राहिलो बेघर कायमचा …
बिल्डर बनलेल्या लबाड पुढाऱ्यांची बांधकामे -घरे ज्यांनी धडा करून घेतली .. त्यांची झाली कि हो घरे … आणि राष्ट्रीयकृत ब्यांका देत नव्हत्या कर्ज, पण याच पुढाऱ्यांचे तळवे चाटनाऱ्या सहकारी ब्यांका ज्यादा दराने देत होत्याच कि कर्ज ….
आणि आता मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केलेच कि हो राहणाऱ्या कुटुंबांकडून दंड घ्या आणि करा घरे कायदेशीर ….
म्हणजे ते बिल्डर बनलेले पुढारी लबाड नव्हते ? होते … तर त्यांना का नाही घातले तुरुंगात … ?
पण इथे घरे घेणाऱ्या लोकांचीच गरिबी असहायता गरजच — गुन्हेगारी प्रवृत्तीची होती म्हणून त्यांनाच झाला हो दंड …. आता ते भरतील ही…तो
पण आमचे काय ? आम्ही कायदेशीर… कायदेशीर वागायचे–नियमबाह्य कसे काय… खरेदी करायचे… राष्ट्रीयकृत ब्यान्काचेच ऐकायचे म्हणून तत्वे पाजाळीत बसलो …….
आम्हाला तर आम्हीच करवून घेतली शिक्षा …. होय
कायदे पाळण्याबद्दलची …
बेघर राहण्याची
शिक्षा भोगतोय आम्ही ….
कायदे तोडणारे-त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी मस्तवाल ….
वा रे सरकार … पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा … वेश्येला मणिहार ……
देवेन्द्रा …फडणवीसा … बाबा, अजब रे तुझे सरकार …