लीला पुनावाला फाउंडेशनने केला शूर जवानांचा सन्मान!
पुणे- दिवाळी हा आनंदाचा सण असतो, आपल्या परिवारापासून दूर राहून स्वतःचे आयुष्य पणाला लावत नागरिकांचे रक्षण करणाऱ्या आपल्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी दिवाळी हा एक खास सण आहे. युद्धादरम्यान जखमी होऊन अपंगत्व आलेल्या शूर सैनीकांसाठी भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर पीस अम्बॅसिडर्स म्हणजेच लीला पुनावाला फाउंडेशनच्या लीला गर्ल्स आणि फेलोजने विविध आणि विशेष मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गरजुंना प्रोत्साहन देऊन सक्षम बनविण्यासाठी लीला पुनावाला फाऊंडेशन नेहमीच आघाडीवर राहिले आहे. शिक्षण आणि मुलींचे सबलीकरण लीला पूनवाला फाउंडेशनचे दोन मुख्य स्तंभ आहेत. फाऊंडेशन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार मुलींना पाठिंबा देतो. अश्या मुलींचा सातवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च एलपीएफ फाऊंडेशन उचलतो. एलपीएफ फाउंडेशनमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल अश्या कितीतरी मुलींना शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
यूके यथील अशा सेंटर मधून लीडरशिप प्रोग्राम पूर्ण करून आलेल्या २४ लीला गर्ल्सच्या बॅच मधील पीए २०१७ च्या लीडर अंकिता जोशी व डेप्युटी लीडर भावना साळवी याची संकल्पनेतुन हा कार्यक्रम साकारण्यात आला. पीए टीम २०१७ व पीस अम्बॅसिडर कश्मीरा देवल यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले होते.
युद्धादरम्यान जखमी झालेल्या जवानांवर केंद्रित असलेला हा कार्यक्रम देशभक्तीने दुमदुमला होता. देशभक्ती व प्रदेशिक गीत गाऊन मुलींनी भारतीय संस्कृतीच्या विविध छटांवर प्रकाश टाकला. मुलींनी भारत रत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर करताच उपस्थित लोक गहिवरून आले.
कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या हुशार मुलींना शिक्षणासाठी मदत करत सक्षम केल्याबद्दल ब्रिगेडिअर एच.एस अगरवाल (एमएस, डी ऑर्थो, फेलो आर्थ्रोप्लास्टी, जर्मनी) यांनी लीला पुनावाला फॉउंडेशन आणि फिरोज पुनावाला यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला.
फाऊंडेशनतर्फे सीमेवर देशाचे रक्षण करताना जखमी झालेल्या व अपंगत्व आलेल्या सैनिकांचे पुनर्वसन करून त्यांना एक नवीन आयुष्य दिल्याबद्दल मिलिटरी हॉस्पिटलचे ब्रिगेडिअर एच.एस अगरवाल व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जे सैनिक या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत त्यांना लीला पुनावाला आणि पीस अम्बॅसिडर्स यांनी खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन या सैनिकांना भेटून त्यिांची चौकशी केली आणि त्यांना 350 स्नॅक्स बॉक्स देखील दिले. या येथेवेळी सैनिकांना मानवंदना देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.