लीला पुनवाला फाऊंडेशनमध्ये दुहेरी उत्सव
पुणे: नूरा-अल-बसम हॉल मध्ये आंनद आणि उत्साहपूर्ण वातावरणात लीला सिनियर्सची पहीली बॅच लीला गर्ल्स बनली आणि लीला जूनियर्सच्या तिसऱ्या बॅचला लीला सिनियर्स ही नवी ओळख मिळाली, हा दुहेरी उत्सव उपस्थितांसाठी देखील अद्वितिय होता.
ही शिष्यवृत्ती लीला पुनावाला फाउंडेशनच्या टुमॉरो टुगेदर ह्या शालेय उपक्रमाच्या पुढाकारतुन दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी निवडल्या गेलेल्या मुलींना सातवी ते पदवीधर शिक्षणासाठी ऑटो स्कॉलरशिप प्रदान केली जाते. ह्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेनंतरनंतर मुली आपल्या आवडीच्या शाखा जसे की अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, डिप्लोमा, कला शाखेच्या शिष्यवृत्तीसाठी आवेदन करु शकतात. एकुन २३८ ( १४७ लीला ज्युनियर्स आणि ९१ लीला सिनियर्स) मुलींना अॉटो स्कॉलरशिप मिळाली आहे.
एलपीएफ द्वारे आर्थिक मदतीसोबत मुलींना व त्यांचा पालकांना वेळोवेळी समुपदेशन व प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास मदत केली जाते, ह्या कार्यक्रमासाठी नेहमीच्या प्रथेप्रमाणे माजी पुरस्कार प्राप्तकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी २ माजी पुरस्कार प्राप्तकर्ते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
१३ तारखेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कीर्ती नलावडे, उपविभागीय अधिकारी (लीला फेलो क्र. ९७) म्हणाल्या की गेल्या दोन दशकात मुलींच्या भूमिकेत बदल झाले असून आता त्या कुटुंबाच्या आर्थिक व घरघुती बाबींमध्ये पुढाकार घेत आहेत. मुलींनी खासकरून ग्रामीण भागातील सार्वजनिक कल्याणासाठी कार्य करावे. ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल कीर्ती यांनी लीला पूनावालांचे आभार मानले.
१४ तारखेच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक शाहीन पटेल (लीला फेलो क्र. ९८ ) यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत केल्याबद्दल लीला पुनावाला यांचे आभार मानले. मुलींना वेगळ्या पद्धत्तीने विचार करायला सांगून सर्जनशील कौशल्यावर भर दिला तर त्यांना वैयक्तीक व व्यावसायिक आयुष्यात त्याचा कसा फायदा होईल हे देखील त्यांनी सांगितले.
शिक्षणतज्ज्ञ व बुद्धिजीवी मान्यवरांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला. कुटुंबासाठी मुलींचे महत्व सांगून समाज सुधारणेसाठी मुलींची लक्षणीय भूमिका असल्याचे लीला पुनावाला म्हणाल्या. पूनावालांच्या व्याख्यानानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.