लीला पूनावाला फाउंडेशनने बहाल केली पुण्यातील मुलींना शिष्यवृत्ती
पुणे: पुण्यातील शिक्षण संस्थांमधल्या मुलींना लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली. लीला पूनावाला युजी-पीजी स्कॉलरशिप अवॉर्ड फंक्शनच्या या कार्यक्रमावेळी मुलींच्या पाल्यांना आनंदाश्रू अनावर झाले.
४ नोव्हेंबर, २०१७ रोजी पार पडलेला हा शिष्यवृत्ती कार्यक्रम एस. जी. बर्वे हॉल, अल्प बचत भवन येथे दोन सत्रांमध्ये पार पडला. आपल्या २१ वर्षांच्या प्रवासात लीला पूनावाला फाउंडेशनने ६००० पेक्षा अधिक मुलींना आधार देऊन त्यांना सक्षम बनविले आहे.
मुलींना त्यांची स्वतःची अशी एक ओळख निर्माण करून देण्याचा हेतूने लीला पूनावाला फाउंडेशनने एक नव्हे तर दोन पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले होते ज्यामध्ये दोन नावाजलेले कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्वे मुख्य अतिथी म्हणून तर दोन लीला फेलोज सम्मानित अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी लीला पूनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला यांनी कुटुंबामध्ये, समाजात आणि अर्थव्यवस्थेत सुशिक्षित मुली काय भूमिका बजावतात हे सांगितले. आज ज्या मुली प्रतिष्ठित कंपन्यांमधे उच्चपदावर काम करत आहेत ते त्या कंपन्यांनाच नव्हे तर देशालाही कसे पुढे न्हेत आहेत हे त्यांनी समजावून सांगितले. त्या म्हणाल्या की नोकरी करण्याऱ्या महिला त्यांच्या कुटुंबाचिच नव्हे तर समाजाची मानसिकता बदलू शकतात व हे पटवून देऊ शकतात की स्त्री-पुरुष समानता ही घरातच नव्हे तर कार्यस्थळीसुद्धा राखली गेली पाहिजे. लीला पूनावाला फाउंडेशनवर व त्याच्या पारदर्शक कारभारावर विश्वास ठेवण्यासाठी लीला पुनावाला यांनी भागीदारांचे आभार मानले. विश्वस्त मंडळ व पॅनल मेम्बर्सचे आभार मानून त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
बीएमसी सॉफवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण शर्मा यांनी बीएमसी कंपनी आपल्या कार्यस्थळी स्त्री-पुरुष समानता राखत असल्याचे सांगत नोकरी करणाऱ्या मुली त्यांच्या कुटुंबावर, समाजावर व देशावर कसा प्रभाव पाडतात यावर भाष्य केले.
लीले फेलो १९९६ व भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर यथे वैज्ञानिक असलेल्या डॉ पूनम पहाडी यांनी फाउंडेशनमधे व्यतीत केलेला काळ व यथे घेतलेल्या शिक्षणाच्या आठवणी जाग्या केल्या. मुलींना स्वावलंबी बनवून त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करण्यासाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे त्यांनी सांगितले.
ऍमडॉक्स इंडियाचे जनरल मॅनेजर रजत रहेजा अपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेत कोणलाही वाटेत अडथळा आणू देऊ नका असे सांगून त्यांनी मुलींना प्रोत्साहन दिले. त्यांनी मुलींना लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊन लीला पूनावालांसारखेच हुशार आणि स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
लीले फेलो १९९६ व क्याझुंगा.कॉमच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी नीतु भाटिया म्हणाल्या की नाविन्यपूर्ण पद्धतीने व्यवसाय करण्याच्या पद्धती महिलांच्या मल्टीटास्किंग व जलद विचार करण्याच्या कौशल्यांचे फलित आहेत. नीतू पोस्ट ग्रॅज्युएशन ओव्हरसीज स्कॉलरशिप मिळवणाऱ्या पहिल्या लीला फेलो ठरल्या होत्या. अशा कार्यक्रमात पुन्हा सहभागी होण्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.