राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह लवकरच भाजप प्रवेश

Date:

मुंबई – भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विखे पाटलांनी आपला राजीनामा मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सुपूर्द केला. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे. त्यातच राजीनामा दिल्यानंतर आता भाजप प्रवेशाच्या हालचालींना आणखी वेग आला आहे. ते काँग्रेसच्या इतर काही बंडखोर आमदारांसह भारतीय जनता पक्षात जाणार असे सांगितले जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांनी लोकसभा निवडणुकीत 2.81 लाख मतांनी विजय मिळवला. मुलाने भाजपची वाट धरल्याच्या अवघ्या काही दिवसांतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची तारीख समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...