वेळ आल्यास दगडाला दगडाने उत्तर देऊ:भाजपाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Date:

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा
पोलखोल रथ यात्रा वाहनाच्या तोडफोड प्रकरणी
भाजपचे चेंबूर पोलिस ठाण्यात आंदोलन

मुंबई, दि. २१ एप्रिल – आम्ही शांत आहोत याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये, वेळ आल्यास आम्ही दगडाला दगडाने उत्तर देऊ, पण ती वेळ आमच्यावर आणू देऊ नका, असा जोरदार इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
भाजपच्या चेंबूर येथील पोलखोल यात्रेच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली होती. याप्रकरणी आरोपींना अटक केली असली तरीही त्यांच्याविरोधात कारवाईसाठी विलंब करण्यात येत असून संशियत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज चेंबूर पोलिस ठाण्यावर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदार आशीष शेलार, आमदार प्रसाद लाड, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तोडफोड प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगितली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन संशयित आरोपींचा पोलिस तपास घेत आहेत. परंतु येत्या २४ तासांत पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली नाही तर भाजपाच्यावतीने टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
पोलखोल यात्रेच्या वाहनावरील तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा सूत्रधार कोण आहे, याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. यामागे कोणीतरी मास्टरमाईंड असून ते आमदार वा आमदारपुत्र आहेत, की यामागे शिवसेनेचा नेता आहे की युवा सेनेचा पदाधिकारी आहे, या सगळ्यांची पोलिसांनी खातरजमा करा आणि त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहितीही दरेकर यांनी यावेळी दिली.
याप्रकरणात जे दोन आरोपी पकडले आहेत त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असून त्यांना तडीपार करा. कारण आमचे पोलखोल अभियान सुरू आहे. जर या समाजविघातक प्रवृत्ती बाहेर राहिल्या तर त्यांची हिम्मत आणखी वाढेल व आमच्या अभियानामध्ये अडथळे निर्माण होण्याचा प्रयत्न समाज विघातक प्रवृत्तींकडून होऊ शकतो. परंतु या परिस्थितीमध्येही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपने पुकारलेले पोलखोल अभियान आम्ही सुरूच ठेवू आणि गेल्या २५ वर्षातील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार जनतेच्या दरबारात उघड करू, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय ,हे महात्मा...