कराड दि.२० (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या समस्याबाबत सघटनेच्या राज्य पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून व अडचणी समजावून घेवून त्या सोडवण्यासाठी स्वत: लक्ष घालून प्रयत्न करणार असल्याची हमी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी यांनी दिली.तर पत्रकार व वृत्तपत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या बैठकीसाठी मुंबई येथे १६ ते २१ डिसेंबर या सहा दिवसांच्या महाराष्ट्र दौच्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्रातील पदाधिकारी यांचेसोबत सह्याद्रि अतिथीगृहावर बैठक होऊन महाराष्ट्रातील छोटय़ा व मध्यम वृत्तपत्राबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्राभर सुरू असलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रविण पाटील, संघटक गोरख तावरे, संघटन सचिव नेताजी मेश्राम, नागपुर विभागीय अध्यक्ष मुंकुंद जोशी उपस्थीत होते.
राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या आरएनआय, डीएव्हीपी, पोस्ट खाते इत्यादींच्या संदर्भात तसेच इतर प्रश्न, समस्या व अडचणीबाबत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. के. डी. चन्दोलाजी यांचेशी चर्चा केली. तसेच यासंदर्भात पुणे येथे लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०१९ ची करण्यात आलेली सभासद नोंदणीची यादी अध्यक्षांच्यांकडे सादर करणेत आली. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील व उपाध्यक्ष प्रविण पाटील यांनी श्री महालक्ष्मी व श्री गणेशाची मुर्ती देवून स्वागत केले.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य के. डी. चंडोलाजी यांचा मुंबई येथील सहय़ाद्री अतिथीगृहावर राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रविण पाटील, संघटक गोरख तावरे, संघटन सचिव नेताजी मेश्राम, नागपुर विभागीय अध्यक्ष मुंकुंद जोशी यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, झाडाचे रोप देवून यथोचित सत्कार केला.

