कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

Date:

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे: रांगोळीच्या पायघड्या… मंदिराला केलेली आकर्षक पुष्प सजावट… सनईचे मंगलमय सूर… दत्त नामाने भक्तिमय झालेले वातावरण आणि हेलिकॉप्टर मधून मंदिरावर होणारी पुष्पवृष्टी पाहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात पुणेकरांचे हात आपसूकच जोडले. हेलिकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टीचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी यावेळी पुणेकरांना मिळाली.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर सुभाष सरपाले, वैशाली सरपाले यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच सोहळ्यादरम्यान शिधा संकल्प योजनेअंतर्गत १२५ अनाथ अपंगांचे संगोपन करणाऱ्या व परितक्त्या महिलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना व वृद्धाश्रमांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, मुकुंदजी लोहिया ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे कार्यवाह महेश करपे, पं. वसंत गाडगीळ, ईशान्य पूरम संस्थेचे विनीत कुबेर, ट्रस्टचे अध्यक्ष  ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त  ॲड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ,  ॲड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. यावेळी ईशान्य पुरम् संस्था, माई बाल भवन, लोकसेवा संस्था इत्यादी संस्थांना धान्य देण्यात आले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुण्यातील ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी अशा शतकोत्तर संस्थाचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक काम करून या संस्था त्यांच्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवत आहेत. लोकमान्य टिळकांच्या काळात पुण्यातील दगडूशेठ कुटुंबियांचे अत्यंत मोलाचे योगदान होते. लोकमान्य टिळक तुरूंगातून बाहेर आल्यानंतर पुण्यातील लोक त्यांच्यासाठी उपहार म्हणून विविध भेटवस्तू घेऊन जात होते. त्यावेळी हलवाई कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी नानकटाई आणली होती, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.  

महेश करपे म्हणाले, पुण्यातील धार्मिक, आरोग्य, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकते याची प्रचिती या कार्यक्रमातून मिळते. ट्रस्टच्यावतीने चालणाऱ्या उपक्रमात संघ नेहमी त्यांच्या मदतीसाठी असेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  महोत्सवाचा शुभारंभ आज वृद्धाश्रम व संस्थांना शिधा वाटप करून झाला. यावेळी मंदिराचा इतिहास व आज पर्यंत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती देखील त्यांनी सांगितली.  

सकाळी १० वाजता अक्षय हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र याग करण्यात आला. त्यानंतर अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख बाबामहाराज तराणेकर यांच्या हस्ते आरती व योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज, श्रीमंत दगडूशेठ हलवाई व श्रीमती लक्ष्मीबाई हलवाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विश्वस्तांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. मंदिरातील माध्यान्ह आरती पुण्याचे पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आली.
ॲड. शिवराज कदम जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे- इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अप्रतिम आशिष ढेंगे...

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...