पुणे, दि 28 डिसेंबर 2021: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत स्कोअर स्पोर्ट्स अकादमी संघाने रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघाचा 90 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
एके मैदान, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निल रोडगेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर स्कोअर स्पोर्ट्स अकादमी संघाने 20 षटकात 6 बाद 141 धावा केल्या. यात आलोक लोढाने 30 तर राज पडवळने 22 धावा करून निलला सुरेख साथ दिली. 141 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सात्विक बोंबलेच्या बिनचूक गोलंदाजी पुढे रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघ केवळ 10.4 षटकात सर्वबाद 51 धावांत गारद झाला. सात्विकने केवळ 9 धावात 4 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. श्रिराज कुलकर्णी व चिन्मय पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सात्विक बोंबले सामनावीर ठरला. स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरीस्कोअर स्पोर्ट्स अकादमी- 20 षटकात 6 बाद 141 धावा(निल रोडगे नाबाद 54(56, 5×4), आलोक लोढा 30(15, 6×4), राज पडवळ 22 (16, 2×4), श्रीराज कुलकर्णी 3-17) वि.वि रायझिंग स्टार क्रिकेट क्लब- 10.4 षटकात सर्वबाद 51 धावा(वरूण वैद्य नाबाद 12(6, 2×4), सात्विक बोंबले 9-4, श्रीराज कुलकर्णी 1-3, चिन्मय पाटील 1-10) सामनावीर- सात्विक बोंबलेस्कोअर स्पोर्ट्स अकादमी संघाने 90 धावांनी सामना जिंकला.

