पुणे,5 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत परंदवाल संघाने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा तर एम्.एस्.एफ संघाने 30 यार्ड्स ए संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
ए.के स्पोर्ट्स क्लब साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विराज घारेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर परंदवाल संघाने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा 37 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना परंदवाल संघाने 20 षटकात 3 बाद 152 धावा केल्या. विराज घारेने 52 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 67 तर यश सुर्यवंशीने 30 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 40 धावा करत संघाचा डाव मजबुत केला. 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आशिष बेडेकर, विराज घारे व सुधांशू कांबळेच्या अचूक गोलंदाजीने 2एन् क्रिकेट अकादमी संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 115 धावांत रोखत संघाला विजय मिळवून दिला. विराज घारे सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात आर्यन भामरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एम्.एस्.एफ संघाने 30 यार्ड्स ए संघाचा 10 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओम अगरवालच्या नाबाद 38 तर महेश्वर वाघ व माऊली बडे यांच्या प्रत्येकी 18 धावांसह एम्.एस्.एफ संघाने 20 षटकात 6 बाद 126 धावा केल्या. 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अरूष पासलकर व आर्यन भामरे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे 30 यार्ड्स ए संघ 20 षटकात 9 बाद 116 धावांत गारद झाला. आर्यन भामरे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी
परंदवाल- 20 षटकात 3 बाद 152 धावा(विराज घारे नाबाद 67(52, 9×4), यश सुर्यवंशी नाबाद 40(30, 6×4), शौनक चांदपुरे 1-17, भावेश चौधरी 1-22) वि.वि 2एन् क्रिकेट अकादमी- 20 षटकात 8 बाद 115 धावा(सुरेखा खराडे 18(31, 1×4), कृष्णा देशमुख 12(11, 1×4), आशिष बेडेकर 3-17, विराज घारे 1-8, सुधांशू कांबळे 1-10) सामनावीर- विराज घारेपरंदवाल संघाने 37 धावांनी सामना जिंकला.
एम्.एस्.एफ- 20 षटकात 6 बाद 126 धावा(ओम अगरवाल नाबाद 38(39, 3×4), महेश्वर वाघ 18(15, 3×4), माऊली बडे 18(15, 3×4), आर्यन भामरे 13(11, 2×4), ओजस अलटेकर 2-28, अर्णव मधुगिरी 2-25) वि.वि 30 यार्ड्स ए- 20 षटकात 9 बाद 116 धावा(दक्ष किरोदीयन 42(41, 4×4, 1×6), विहान बागड 17(18, 2×4), अरूष पासलकर 3-19, आर्यन भामरे 2-16) सामनावीर- आर्यन भामरे एम्.एस्.एफ संघाने 10 धावांनी सामना जिंकला.
स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत परंदवाल संघाचा विजय
Date: