पुणे, दि.9 फेब्रुवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत विशाल क्रिकेट क्लब संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा तर अमर इलेव्हन संघाने रायझिंग चॅम्पियन संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत शुभम पडवळच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर विशाल क्रिकेट क्लब संघाने प्राधिकरण जिमखाणा संघाचा 130 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना विशाल क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 3 गडी गमावत 189 धावा केल्या. शुभमने 62 चेंडीत 11 चौकार व 7 षटकारांसह 103 धावांची दमदार खेळी करत संघाचा डाव मजबूत केला. खालिद कुरेशीने 36 धावा करत शुभमला सुरेख साथ दिली. 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वरूप गोडसे व अभिषेक भाटकरच्या अचूक गोलंदाजीपुढे प्राधिकरण जिमखाणा संघ केवळ 14.2 षटकात सर्वबाद 59 धावांत गारद झाला. स्वरूपने 13 धावात 4 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. शुभम पडवळ सामनावीर ठरला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत ओमकार कोतळकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर अमर इलेव्हन संघाने रायझिंग चॅम्पियन संघाचा 20 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना अमर इलेव्हन संघाने 20 षटकात 8 बाद 161 धावा केल्या. यात रिशव सहायने 26 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 48 तर शुभम थावरेने 27 धावा करून संघाचा डाव बळकट केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमकार व मनिष सुपालच्या अचूक गोलंदाजीने रायझिंग चॅम्पियन संघाचा डाव 19.2 षटकात सर्वबाद 141 धावांत रोखला. 19 धावा व 33 धावात 3 गडी बाद करणारा ओमकार कोतळकर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरीविशाल क्रिकेट क्लब – 20 षटकात 3 बाद 189 धावा(शुभम पडवळ 103(62, 11×4, 7×6), खालिद कुरेशी 36(29, 3×4, 2×6), फैयाज लांडगे 1-19, धिरज परमबथ 1-28) वि.वि प्राधिकरण जिमखाणा- 14.2 षटकात सर्वबाद 59 धावा(प्रतिक फाळके 15(16, 3×4), स्वरूप गोडसे 4-13, अभिषेक भाटकर 2-12, वैभव नारडे 1-8) सामनावीर- शुभम पडवळविशाल क्रिकेट क्लब संघाने 130 धावांनी सामना जिंकला.
अमर इलेव्हन- 20 षटकात 8 बाद 161 धावा(रिशव सहाय 48(26, 5×4, 2×6), शुभम थावरे 27(22, 1×4, 2×6), ओमकार कोतळकर 19(27, 1×4, 1×6), फरझान शेख 2-18, राहूल राठोड 2-41) वि.वि रायझिंग चॅम्पियन – 19.2 षटकात सर्वबाद 141 धावा(दत्तराज पाटील 36(22, 4×4, 2×6), राम धायगुडे 35(21, 3×4, 2×6), ओमकार 3-33, मनिष सुपाल 2-17) सामनावीर- ओमकार कोतळकरअमर इलेव्हन संघाने 20 धावांनी सामना जिंकला.

