पुणे, दि.11 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत अमन शेख(2-6) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने अजिंक्य क्रिकेट क्लबचा 6 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमीच्या अमन शेख(2-6), दिप पाटील(2-8), स्वराज मासगुडे(2-11), रिंकू सांगवन(1-9)यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लबचा डाव 14.5षटकात 43 धावावर कोसळला. यात अंबरेश सय्यालीच्या 15धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 7.2 षटकात 4बाद 44धावा करून पूर्ण केले. यामध्ये दिप पाटील 13, स्वराज मासगुडे 8, स्वरीत परंदकर नाबाद 7 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अमन शेख ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:अजिंक्य क्रिकेट क्लब: 14.5षटकात सर्वबाद 43 धावा(अंबरेश सय्याली 15, अमन शेख 2-6, दिप पाटील 2-8, स्वराज मासगुडे 2-11, रिंकू सांगवन 1-9)पराभूत वि.चंद्रोस क्रिकेट अकादमी: 7.2 षटकात 4बाद 44धावा(दिप पाटील 13, स्वराज मासगुडे 8, स्वरीत परंदकर नाबाद 7, वेदांत अरुतवार 2-16, आभास दाणी 1-5, अक्षत गणेश 1-6);सामनावीर-अमन शेख; चंद्रोस क्रिकेट अकादमी संघ 6 गडी राखून विजयी.