स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ वी जयंती निमित्त ३२ वी लोणावळा – पुणे सायकल स्पर्धा

Date:

पुणे : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ वी जयंती निमित्त  लोणावळा – पुणे सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे ३२ वे वर्ष आहे. सायकल  स्पर्धा लोणावळा येथून लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष राजू गवळी तसेच निखिल कवीश्वर, बाळासाहेब शिर्के, सुवर्णा अकोलकर,दिलीप लोंढे, विलास बडेकर व संजय बालगुडे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखून स्पर्धेला सुर्वात  झाली. सुमारे १५ स्पर्धकांनी या स्पर्धेत  भाग घेतला. या स्पर्धेत क्रमांक १ चा स्पर्धक केशव बजंत्री व क्रमांक ३ चा विकास शेटे यात चुरस पाहण्यात आली. हे स्पर्धा ६० किलोमीटर ची होती. नंबर १० चे स्पर्धक यांनी चांगली पकड ठेवत पुढे राहायचा प्रयत्न केला पण नंबर १ चा स्पधक केशव बजंत्री यांनी सुरवाती पासून आपली सायकल ची गती कायम ठेवत पाहिले क्रमांक पटकाविले.  हे शर्यत बालेवाडी येथे समाप्त झाली. ६० किलोमीटर चे अंतर केशव बजंत्री यांनी १तास ३४ मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांकचा मान पटकविला, तर दुसऱ्या क्रमांत वर विकास शेटे यांनी १ तास ४२ मिनिटात पूर्ण केली, तिसऱ्या क्रमांकाचे स्थान हनुमान चोपडे यांनी १ तास ४८ मिनिटात पूर्ण करण्यात यश मिळाले. काँग्रेस  भवन येथे या स्पर्धकांना प्रशस्ती पत्र प्रमुख पाहुणे धनंजय दामले ( अध्यक्ष महराष्ट्र मंडळ शिक्षण संस्था ), व रमेश बागवे ( अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटी ) याच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. क्रमांक १ चे स्पर्धक केशव बजंत्री यांना प्रशस्तीं पत्र व रुपये ५०००/ रोख , दुसऱ्या क्रमांक चे मानकरी विकास शेटे यांना रुपये ३०००/ रोख व सर्टिफिकेट, तर तिसऱ्या क्रमांक चे मानकरी हनुमान चोपडे यांना रुपय २०००/ रोख देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी  अनिल पायगुडे, उपस्थित होते. या प्रसंगी रमेश बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी  यांना अनेक सुविधा व शासनाकडून कशी मदत मिळेल याचे प्रयत्न केले पाहिजे. संजय बालगुडे गेले ३२ वर्ष हा उपक्रम एक निष्ठेने करीत आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम घेणे सोपे आहे पण त्या मागची मेहेनत संजय बालगुडे अनेक वर्षान पासून घेत आहेत  हे फार उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाचे संयोजन संजय बालगुडे यांनी केले तर सर्वांचे स्वागत अनंतराव गांजवे  यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अशोक जगताप यांनी मानले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...