मुंबई : स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले.त्या 92 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले, भाऊ हृदयनाथ, रश्मी उध्दव ठाकरे, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह त्यांच्या प्रक्रुतीची विचारपूर्वक करण्यासाठी सायंकाळपासून अनेक नामवंतांची रिघ लागली आहे.
पार्श्वगायिका लता मंगेशकर उर्फ ‘दीदी’ (वय 92) यांची प्रकृती शनिवारी दुपारी बिघडली. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लता मंगेशकर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.मंगेशकर आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, आयसीयूमध्ये उपचार घेत असून आठ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आला. 8 जानेवारी रोजी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 जानेवारी रोजी सुधारणा दिसून आल्याने त्यांचा व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला होता.लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
लता मंगेशकर यांच्या वडिलांची झाली होती दोन लग्ने
लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची दोन लग्ने झाली होती. दोन सख्ख्या गुजराती भगिनींसोबत दीनानाथ यांचे लग्न झाले होते. दीनानाथ मुळचे मराठी होते. त्यांचे पहिले लग्न 1922 मध्ये गुजरातच्या थलनेर (तापी नदीच्या किना-यावर वसलेले) गावातील नर्मदाबेनसोबत झाले होते. नर्मदाबेन यांचे वडील हरीदास त्याकाळातील गुजरातमधील मोठे जमीनदार होते. त्यांना नगरसेठ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात गुजराती तरुणीचे मराठी तरुणासोबत लग्न होणे, ही मोठी गोष्ट होती
लता नव्हे हेमा आहे मुळ नाव
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोरमध्ये झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘हृदया’ असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर वडिलांनी ते बदलून लता असे केले. लता हे नाव दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांच्या ‘भवनबंधन’ या नाटकातील लतिका या पात्रावरुन प्रेरणा घेऊन ठेवले होते. इतकेच नाही तर हे नाव दीनानाथ यांच्या पहिल्या पत्नी नर्मदाबेन यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचेही म्हटले जाते. नर्मदा यांना त्यांच्या मातोश्री लतिका म्हणून हाक मारायच्या. जेव्हा लता यांचा जन्म झाला, तेव्हा लतिका यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव लतिका ठेवण्यात आले होते, जे पुढे लता झाले.

