पुणे-लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ चित्रपटाच्या टीमने पुण्यातील प्रसिध्द गणपती दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेतले. ज्याप्रमाणे चित्रपटाचा श्रीगणेशा ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाने झाला त्याचप्रमाणे पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ’च्या दर्शनाशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही, असे उतेकर यांना वाटते. पुण्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेले लक्ष्मण उतेकर, वीणा जामकर, अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव आणि लेखक रोहन घुगे यांनी गणेशाची आरती करून ‘लालाबागची राणी’ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. विशेष मुलीच्या भावविश्वावर आधारित ‘लालबागची राणी’ हा सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे