‘लगन’६ मे ला चित्रपटगृहात

Date:

प्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जी.बी.एंटरटेंन्मेंट निर्मित हा चित्रपट येत्या शुक्रवारी ६ मे ला चित्रपटगृहांत दाखल होत आहे. लगन चित्रपटातून अज्या आणि नांदिनीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या जोडीसोबत स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’  या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेमाला प्रेमानेच जिंकता येऊ शकतं हा  विचार घेऊन हा चित्रपट केल्याचे दिग्दर्शक अर्जुन गुजर सांगतात. ही फ्रेश जोडी आणि चित्रपटाचं संगीत प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास ही ते व्यक्त करतात. 

लगनचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते सय्यद मुस्तफा, भारत गुजर, रत्नमाला पवळ, मोहिनी गुजर, गहिनाथ गुजर आहेत तर चित्रपटाचे सहनिर्माते बिभीषण पवार, बळे साहेब, कैलास गुजर, किशोर काकडे,नितीन भारती, सपकाळ फोजी, शाहजी डोके, सोमिनाथ डोके,  मुन्ना शेख, विठ्ठल पाटोळे,बिभीषण गुजर, विष्णू गुजर, नामदेव गुजर, अंगद गुजर, गणेश गुजर आहेत. छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

६ मे ला लगन चित्रपटगृहात दाखल होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...