Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्नेहा झाली ‘रॅगिंग’ची शिकार!

Date:

‘लाल इश्क – गुपित आहे साक्षीला’ चित्रपटाची हवा आता सर्व ठिकाणी चांगलीच झाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी आता या चित्रपटाचीच चर्चा आहे. स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, जयवंत वाडकर, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला या तगड्या स्टारकास्टसोबतच या चित्रपटातून एक ग्लॅमरस नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. ती आहे स्नेहा चव्हाण. आता नवीन व्यक्ती म्हटली कि त्याची थट्टा, मस्करी करणं आलंच. असचं काहीसं घडलं स्नेहाबरोबर. शुटींगच्या पहिल्याच दिवशी स्नेहाचे रॅगिंग करण्यात आले. कॉलेजमध्ये असताना जसे जुनिअर्सची हलकी फुलकी रॅगिंग केली जाते. तशीच रॅगिंग स्नेहासोबत झाली.पण हि रॅगिंग तिनेसुद्धा खूप एन्जॉय केली आहे. त्याचे झाले असे कि स्वप्नील जोशीने तिला सांगितले की,’कॅमेरामनला शकुनाचे १०१ रुपये देऊनच शुटींगला सुरुवात करायची असते. असे केले तरच तुझे करीयर सुपरहिट होईल.’ त्याच्या या सुरात उपस्थित सर्वांनीच सूर मिळवला. त्यांचे हे बोलणे साध्या-भोळ्या स्नेहाला खरेच वाटले आणि ती शॉटच्या आधी कॅमेरामनला १०१ रुपये द्यायला गेले. आणि तिला पाठून हसण्याचा जोरजोरात आवाज आला. मागे वळून बघितले तर स्वप्नीलसह सर्वच टीम तिच्याकडे बघून हसत होते. तेव्हा तिला आपल्यासोबत रॅगिंग केल्याचे समजले. 
 
‘हा रॅगिंगचा अनुभव माझ्यासाठी फारच मजेदार होता. या सर्वांसोबत काम करताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. अशीच धम्माल आम्हीसुद्धा करायचो’, असे स्नेहाने सांगितले. 
 
 भन्साळी प्राॅडक्शन या बॅनरखाली संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. पटकथा व संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. या सिनेमाची सहनिर्मिती शबीना खान यांनी केली आहे. येत्या २७ मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताबसमृद्ध...