नव्या एसयूव्ही डिझाइनसह 40 नवी वैशिष्ट्ये व सुधारणा,
नव्या व अधिक प्रीमिअम व आकर्षक अंतर्भागासह नवी हाय-टेक वैशिष्ट्ये,
किंमत 4.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम मुंबई, के2 प्रकारासाठी)
मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या भारातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादकाने आज नव्या केयूव्ही100 नेक्स्टचे अनावरण केले. 40 नवी वैशिष्ट्ये व सुधारणांचा समावेश असलेल्या केयूव्ही100 नेक्स्टची नवे व अधिक आक्रमक एसयूव्ही डिझाइन, अधिक हाय-टेक वैशिष्ट्ये, अधिक प्रीमिअम अंतर्भाग आणि गाडी चालवण्याचा उत्तम व आनंददायी अनुभव ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. केयूव्ही100 नेक्स्ट आता 5 व 6 आसनी पर्यायांसह, पेट्रोल व डिझेल या दोन्ही पर्यायांत के2 व के2+, के4+, के6+ आणि के8 या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध होईल.केयूव्ही100 नेक्स्टची किंमत के2 प्रकारासाठी 4.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम मुंबई) असेल.
यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, “केयूव्ही100ने 4.5 रुपये ते 7.5 लाख रुपये या दरम्यानच्या किमतीच्या श्रेणीमध्ये एसयूव्हीमध्ये नवी श्रेणी निर्माण केली आहे. आम्ही नेहमीच ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतो व त्यानुसार आम्ही 21 महिन्यांमध्ये नवी केयूव्ही100 यशस्वीपणे दाखल केली आहे. त्यातील वैशिष्ट्ये विचारात घेता, आघाडीवर राहती अशी उत्पादने तयार करण्याबाबतचा ग्राहकांचा महिंद्राच्या क्षमतांवरील विश्वास केयूव्ही100 नेक्स्टमुळे निश्चितच वाढेल, असा विश्वास वाटतो.”
महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले, “नवी केयूव्ही100 नेक्स्ट दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आजच्या ग्राहकांची प्रीमिअमनेस, स्टायल व हाय-टेक वैशिष्ट्ये या बाबतीत बरीच अपेक्षा असते आणि केयूव्ही100 नेक्स्टमध्ये या अपेक्षा नक्कीच पूर्ण होताना दिसतील. यूव्ही श्रेणीच्या वाढीला प्रामुखअयाने कॉम्पॅक्ट एसयूव्हीमुळे चालना मिळत असल्याचे लक्षात घेता, पहिल्यांदा कार घेणारे व अपग्रेड करणारे अशा दोन्ही ग्राहकांच्या अपेक्षा केयूव्ही100 नेक्स्टमुळे पूर्ण होतील”.
नव्या केयूव्ही100 नेक्स्टची बांधणी एसयूव्हीसारखी दणकट आहे व त्यामध्ये एकंदर सुरक्षा व मनःशांतीसाठी एबीएस व ड्युएल एअरबॅग्स (के2+ पासून पुढे) आहेत. 6 व्यक्ती अतिशय आरामात व ऐसपैस जागेत बसू शकतील, अशी या किमतीची ही एकमेव गाडी आहे.
ग्राहकांना गॅसोलिन व डिझेल अशा दोन्ही पर्यायांतून सोयीच्या पर्यायाची निवड करता येईल – एमफाल्कन जी80 हे 1.2 लिटर, एमपीएफआय व ड्युएल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन असून त्याची क्षमता 61 किलोवॅट (82bhp) आहे व टॉर्क 115 एनएम आहे आणि एमफाल्कन डी75 हे 1.2 लिटर टर्बो-चार्ज्ड, डिझेल इंजिन असून त्यामध्ये सीआरडीआय तंत्रज्ञान आहे व त्याची क्षमता 57.4 किलोवॅट (77bhp) आहे व टॉर्क 190 एनएम आहे.
नव्या केयूव्ही100 नेक्स्टमध्ये या श्रेणीतील पहिलेच फ्लेक्सी 6 व 5 आसनी पर्याय आहेत व त्यातील फ्लॅटफ्लोअरमुळे 6 प्रौढ व्यक्तींना बसण्यासाठी भरपूर लेगरूम व हेडरूम उपलब्ध होते. यामध्ये कपहोल्डर्ससह फ्रंट व रिअर आर्मरेस्ट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, अंडरफ्लोअर व अंडरसीट स्टोअरेज आणि 243 लिटर्स बूट स्पेस (फ्लॅट फ्लोअरसह 473 लिटरपर्यंत वाढवण्याची सोय) अशी साठवणुकीची नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
नवी केयूव्ही100 नेक्स्ट 8 आकर्षक रंगांत मिळेल – फिएरी ऑरेंज, फ्लॅमबॉयंट रेड, पर्ल व्हाइट, डॅझलिंग सिल्व्हर, डिझाइनरग्रे, मिडनाइट ब्लॅक व फ्लॅमबॉयंट रेडचे मेटॅलिक ब्लॅक व मेटॅलिक ब्लॅकसह डॅझलिंग सिल्व्हर असे 2 ड्युएल टोन पर्याय
नव्या केयूव्ही100 नेक्स्टमधील नवी वैशिष्ट्ये व प्रमुख सुधारणा
सुधारित स्टाइल व एसयूव्ही शैली:
1. नवे आक्रमक फ्रंट ग्रिल
2. सिल्व्हर स्किड प्लेट्ससह नवे दणकट फ्रंट व रिअर बम्पर्स
3. व्हील क्लेडिंगसह नवे फ्लेअर्ड व्हील आर्चेस
4. नवी दणकट बांधणी
5. नवे डिझाइन टेल-गेट
6. ब्लॅक बेझ सराउंड्ससह नवे फॉग लॅम्प्स
7. एलईडी डीआरएलसह नवे सनग्लास-प्रेरित ड्युएल चेम्बर हेडलॅम्प्स
8. नवे 38.1 सेमी (15”) डायमंड कट ड्युएल टोन अलॉय
9. साइड-टर्न इंडिकेटर्ससह नवे ओआरव्हीएम
10. नवे एकात्मिक रूफ रेल्स
11. नवे डोअर व सिल क्लेडिंग
12. नवे डबल बॅरेल क्लिअर लेन्स टेल लॅम्प्स
13. एअरो कॉर्नर्ससह नवे एरिओडायनॅमिक स्पॉयलर
तंत्रज्ञानाची आधुनिक वैशिष्ट्ये:
1. यूएसबी, ऑडिओ, इमेज व व्हीडिओ प्लेबॅकसह नवी 17.8 सेमी (7”) टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम
2. नवे जीपीएस नेव्हिगेशन
3. नवे इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर कंट्रोल पॅनेल
4. इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससही नवे इलेक्ट्रिकली फोल्डेबल ओआरव्हीएम
5. नवे इलेक्ट्रिक पद्धतीने चालणारे टेलगेट लॅच
6. नवे इंटलिपार्क – रिव्हर्स पार्किंग असिस्ट सेन्सर्स
7. व्हॉइस अलर्टसह नवी ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम
8. रिमोट बूट ओपनिंग की
9. नवे गिअर शिफ्ट अलर्ट
इंजिनातील बदल: गाडी चालवण्याच्या नव्या व आनंददायी अनुभवासाठी नवे इंजिन माउंट तंत्रज्ञान.
प्रीमिअम व आकर्षक अंतर्भाग:
1. नवा स्पोर्टी ब्लॅक अंतर्भाग
2. नवे सीट फॅब्रिक डिझाइन व रंग
3. सुधारित सीट ब्लोस्टरिंग
4. नवे क्लस्टर इल्युमिनेशन
5. नवे सेंटर कन्सोल डिझाइन
महिंद्राविषयी
19 अब्ज डॉलर उलाढाल असलेला महिंद्रा समूह म्हणजे कंपन्यांचे फेडरेशन असून व्हॉल्युमच्या बाबतीत, समूह युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्य महिंद्राचे 100 देशांत अंदाजे 200,000 कर्मचारी आहेत.