पुणे-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील मातोश्री अश्रमातील मुलांना व ममता अंधकल्याण केंद्र येथील विशेष मुलांना दीपावली फराळ देवून शुभेच्छा दिल्या. *याबाबत बोलताना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड सांगितले की, विशेष मुले व अनाथ मुलांबरोबर दिपवाळीच्या उत्सवानिमित्ताने अशा मुलांना दिपवाळी फराळ कपडे व साबन इ. साहित्ये देवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणुन गेली पाच वर्षपासून वेगावेगळ्या आश्रमात जावून हा उपक्रम राबवित आहोत. यावेळी अश्रमातील मुल आमच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थाना करतात व जेंव्हा प्रेमाने मिट्ठी मारतात तेंव्हा गहीवरून येते. आणि दर वर्षी आपणही समाजाचे काही देणे आहोत या माणुष्कीच्या भावनेने केलेल्या या उपक्रमाचे सार्थक झाल्याचे भाव निर्णान होतात. या आनाथ मुलांना ही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा.त्यांना ही आपल्या घरी नातेवाईक आल्याचा आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम राबविला जातो.* यावेळी मातोश्री अश्रमाचे संस्थापक राम दौंडकर यांनी सांगितले की ते स्वःता पार्टटाईम काम करुन व समाजातील काही दानसुर व्यक्तींच्या मदतीने या मुलांचा सांभाळ करीत आहेत. तसेच ममता अंध कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे यांनी सांगितले की मराठवाडा व इतर भागातुन आनेक विशेष मुले या संस्थेत येतात त्यातील काही अंध मुले आज युपीसी – एमपीसी परीक्षाची तयारी करीत आहेत. समाजातील प्रत्येकाने असा मुलांच्या मदतीसाठी पुढे येयाला हवे. यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, विकास शाहाणे ,अँड. सचिन काळे , मुरलीधर दळवी, आरुण मुसळे, संगिता जोगदंड, शुभांगी जोशी, गजानन धाराशिवकर, एस.टी विभुते, आरविंद मांगले,आदी पदाधिकारी उपस्थित होते.