क्रांतीच्या साथीने रंगणार एक आगळीवेगळी मैफिल!!!

Date:

सगळ्यांच्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर एक खास ‘मैफिल’ रंगणार आहे. संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. क्रांती रेडकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ‘मैफिल’च्या प्रत्येक भागात एक विशेष पाहुणा मंचावर उपस्थित असेल. त्याच्या साथीने गप्पा आणि संगीताची एक अनोखी मैफिल रंगेल. प्रेक्षकांची फर्माईश लक्षात घेऊन विविध गाणी सादर केली जाणार आहेत. अशा या निराळ्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका असलेल्या क्रांतीशी जेव्हा खास गप्पा मारल्या तेव्हा;
१. पहिल्यांदाच तू संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेस. तुझ्या भावना काय आहेत?
एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. विनोदी कार्यक्रम किंवा अवॉर्ड शोजचं सूत्रसंचालन करण्यापेक्षा, हे आव्हान नक्कीच वेगळं असणार आहे. संगीत क्षेत्रातील अनेक अनुभवी व्यक्तींसोबत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. संगीत ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. मंचावर काय घडतंय, एवढंच सांगण्यापलीकडे, मला आणखी समृद्ध करणारे उत्तमोत्तम अनुभव या कार्यक्रमातून मिळतील, हे निश्चित!!
२. अभिनय, नृत्य आणि निवेदन या तीनपैकी तुझ्यासाठी सर्वात आवडतं काय आहे?
अभिनय आणि नृत्य या दोन कलांविषयी मला अधिक आपुलकी आहे. यापैकी नृत्यकलेविषयी म्हणाल, तर ही कला नैसर्गिकपणे माझ्या आलेली आहे. मी एकटी असतानाही, मनमुरादपणे नाचू शकते. अभिनायाची सुद्धा मला खूप आवड आहे. अभिनय करणं, ही गोष्ट या तिन्हीमध्ये माझ्यासाठी सर्वात जास्त जवळची आहे असं म्हणता येईल. निवेदन हा माझा छंद आहे, आणि तो जोपासायला सुद्धा मला आवडतं. निवेदक हा कार्यक्रमाला धरून ठेवणारा एक महत्त्वाचा धागा असतो. त्यामुळे निवेदन करण्याची एक वेगळी मजा आहे. अभिनय आणि नृत्याशी त्याची तुलना करणं मला शक्य होणार नाही.
३. तुला गायला आवडतं का? कुठल्या प्रकारची गायन ही तुझी आवड आहे?
गाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मला हेवा वाटतो असं म्हणायला हरकत नाही. देवाने इतका सुंदर गळा त्यांना दिला याचा हेवा नक्कीच वाटतो. मला गायला आवडतं; म्हणूनच मला असं वाटतं, की मी गाणं शिकायला हवं होतं. व्यावसायिक गायक होता आलं नसतं, तरीही स्वतःपुरतं गाण्याचा आनंद मला नक्कीच लुटता आला असता.
४. यानिमित्ताने ‘झी युवा’सोबत पुन्हा एकदा काम करणार आहेस. त्याविषयी तुझ्या भावना काय आहेत?
‘झी युवा’ हे माझ्यासाठी एक महत्त्वाचं कुटुंब आहे. मी या वाहिनीसोबत खूप काम केलेलं आहे. मी एका कार्यक्रमाचं निवेदन करते आहे; एवढाच विचार यावेळी नसतो. हा आपला कार्यक्रम आहे, आपल्याला यात आणखी चांगलं काय करता येईल, ही भावना ‘झी युवा’च्या टीमसोबत काम करताना मनात असते.
५. या नव्या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांना काय सांगशील?
संगीतकारांना जेवढा आदर आणि सन्मान मिळायला हवा, तो आपण द्यायला विसरतो, असा सल मनात कुठेतरी आहे. त्यांना जगासमोर आणणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे. प्रत्येक गाण्याची एक पार्श्वभूमी असते, एक छोटीशी गोष्ट असते. ती सगळ्यांना माहिती नसते. या गमतीजमती, हे किस्से लोकांपर्यंत पोचवता यावेत, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. खरंतर, या कार्यक्रमाविषयी जेवढं बोलावं, सांगावं तेवढं कमीच आहे. हा अप्रतिम कार्यक्रम सगळ्यांनी नक्की पाहायला हवा. सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० या वेळात ही मैफिल झी युवा वाहिनीवर अनुभवता येईल. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...