पुणे-कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दुबईवरून आलेल्या सुमारे ४३१ प्रवाशांची लोहगाव विमानतळावर गेल्या दोन दिवसांत तपासणी करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली.
‘कोरोना’मुळे देशातील सर्वच विमानतळांना सतर्क राहण्याचा आदेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिला आहे. ‘एअरपोर्ट हेल्थ ऑर्ननायझेशन’चे पथक विमातळावर आले आहे. दुबईवरून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची विमातळावर तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी २६७; तर शुक्रवारी १६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच स्कॅनही केले जात आहे
आंतरराष्ट्रीय विमानसेवेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी (स्क्रिनिंग) करण्यासाठी लोहगाव विमानतळावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

