टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यामुळे कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील

Date:

रंकाळा तलाव परिसरातील ‘चाय पे चर्चा’ द्वारे नागरिकांशी संवाद

कोल्हापूर- जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करुन कोल्हापूरकर जनतेला दिलासा दिला. त्यामुळे टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यावर उत्तर कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारार्थ शहर भाजपाच्या वतीने कोल्हापूर मधील रंकाळा तलाव परिसरात चाय पे चर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष . आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेऊन, मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास आण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते उपस्थित होते.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोल्हापूर मध्ये टोलचा प्रश्न अतिशय त्रासदायक ठरला होता. विद्यमान पालकमंत्री त्याकाळी हा प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आंदोलन करुन दिशाभूल करत होते. पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता, ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करुन, टोलच्या त्रासापासून कोल्हापुरकरांना मुक्त केले. त्यामुळे टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यावर कोल्हापूरकर जनता भाजपाला नक्कीच मतदान करतील.

ते पुढे म्हणाले की, सत्यजितनाना कदम हे कोल्हापूरच्या राजकारण आणि समाजकारणातील अतिशय जुनं घराणं आहे. त्यांचे वडील शिवाजीराव कदम यांनी महापौर म्हणूनही कोल्हापूरकरांची सेवा केली आहे. त्यामुळे सत्यजितनाना कदम हे देखील सामाजिक कामामुळे जनतेशी जोडले गेलेले आहेत.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे उत्तर कोल्हापूरकर जनतेने शहराच्या काळजीसाठी भाजपाच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. २०१९ च्या महापुरानंतर माननीय देवेंद्रजी आणि दादांमुळे नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळाले. पण २०२१ च्या महापुरातील नुकसानीचे पैसे अजूनही कोल्हापूरकरांना मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांचे तर प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी १३५, ११६ रुपये देऊन, क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळे उत्तर कोल्हापूर मधील जनता पोटनिवडणुकीत विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवून देतील.

दरम्यान, यावेळी आ. पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी चाय पे चर्चा कार्यक्रमानंतर आरोग्यवर्धक काढ्याचे वाटप करुन, आस्वाद ही घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...