इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत अधिकाऱ्यांना शरद पवारांचे निर्देश…

Date:

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

पुणे– इंद्रायणी नदी प्रदूषणाच्याबाबतीत दोन – तीन वर्षाचा कार्यक्रम हाती घेऊन इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदी प्रदूषण सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयुक्त,पुणे महानगरपालिका आयुक्त, तसेच पीएमआरडीए मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रदूषणाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. नदीमध्ये होत असलेले प्रदूषण त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे. त्यासाठी किती खर्च येणार आहे आणि केंद्रशासनाकडून निधी किती उपलब्ध करायचा, राज्य शासनाकडून किती निधी उपलब्ध करायचा व उर्वरित निधी कोणकोणत्या माध्यमातून उपलब्ध करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related