पुणे- कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या माध्यमातून मांदेडे ता. मुळशी सारख्या ग्रामीण भागाचा विकास करणेसाठी पुण्याच्या शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (एस एल के ) ग्लोबल सोल्युशन्स कंपनीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या मदतीने सुरुवात केली असून या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांचे व प्रकल्पाचे उद्घाटन एस एल के चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल अमीन व कर्वे समाज सेवा संस्थेचे सचिव शिवकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
एस एल के च्या सी एस. आर विभागाचे प्रमुख इंदू शेखर मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष ऋषी अगरवाल तसेच कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर व सी एस. आर विभागाचे मानद संचालक प्रा. महेश ठाकूर यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालय उद्घाटन व प्राथमिक शाळेतील ई लर्निंग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली
मांदेडे गावच्या महिला व सर्व ग्रामस्थांचा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी एस एल के सदैव तत्पर असून गावातील मुलभूत सोयी-सुविधा व पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर आपण आघाडीने काम करणार असल्याचे गोपाल अमीन यांनी सांगितले.
मांदेडे गावच्या नागरिकांच्या विकासासाठी एस एल के कंपनी व कर्वे समाज सेवा संस्था आधुनिक शेती, पशुधन व पारंपारिक उद्योग व्यवसायांसह इतर जीवनोपयोगी आधारित उत्पन्नाच्या कौशल्यावर भर देणार असून नागरिकांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वालोकर यांनी केले.
प्रकल्प संचालक प्रा. महेश ठाकूर म्हणाले, प्रकल्प राबविनेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून ग्रामस्थांच्या सहभाग व मदतीने गावचा कायापालट होईल यात शंका नाही.
यावेळी इंदू शेखर, एम. शिवकुमार, गुरदीप सिंघ, इवान झाइसन, दीप्ती कांबळे , जि.प.सदस्य सागर काटकर, माजी मुळशी प. स. सभापती खंदारे आदीं प्रमुख उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांचे स्वागत सरपंच कु अरुणा वीर व उपसरपंच संजय वीर यांनी केले. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक सागर लवटे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा. महेश ठाकूर, चयन पारधी, राजू घाडगे, तपस्या शेलार, शिक्षा मिश्रा, प्रा. चेतन दिवान, दीप्ती कांबळे, अरुणा वीर, मदन वीर, शंकर वीर, ग्रामसेवक वाकळे आदींनी परिश्रम घेतले.