Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्यांचे संबंध, निल सोमय्या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर; दोघांनाही अटक करा – संजय राऊत

Date:

  • फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा; किरीट सोमय्या ईडीचे दलाल-
  • देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोज, कंबोज फडणवीसांना बुडवणार.
  • मला कुणीतरी म्हटले की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळले पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचे बाकी राहिले आहे.
  • तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, 7 हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. तेव्हापासून महाराष्ट्रात येणे जाणे सुरु झाले. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणे जाणे सुरु होते आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केले मनी लाँड्रिंग, 7 हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली.
  • ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या…मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू…तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल.
  • चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसे याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन…जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण?
  • महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला आहे.
  • कोरलाईत जर 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडणे, पण जर कोरलाई 19 बंगले दिसले नाही तर त्या दलाला जोड्याने मारेण.
  • जे माझ्यावर आरोप झालेत, त्यातील एकही आरोप खरा नाही.
  • ईडीच्या कार्यालयासमोर आजची पत्रकार परिषदेत घेण्याची योजना करणार होतो. पण शेवट तिथे करण्याचा निर्णय घेतला.
  • सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पाडू, आम्ही केंद्रीय पोलिस यंत्रणा आणून थंड करु.
  • अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचे संकट आहे. असेच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे.
  • मराठी माणसाविरुद्ध होणाऱ्या आक्रमणांच्या विरुद्ध रणशिंग फुंकणे गरजेचे आहे आणि ते काम आम्ही करत आहोत. आम्हाला संदेश द्यायचाय की, आम्ही घाबरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहे.
  • महाराष्ट्र ….ची औलाद नाही हेच आजच्या पत्रकार परिषदेतून सांगायचे आहे. तुम्ही कितीही नामर्दानगी करुन आमच्या पाठीमागून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही.
  • गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहत आहात. शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल. आनंदराव अडसूळ असतील. अनिल परब असतील, भावना गवळी, पवार साहेबांचे कुटुंबीय अशा सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पध्दतीने हल्ले करत आहेत. मला असे वाटते की, हे महाराष्ट्रावरच नाही तर देशावरचं संकट आहे.

मुंबई-शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर बॉम्ब गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. तर त्यांचा मुलगा या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. असा आरोप राऊतांनी केला आहे.

याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, निल सोमय्या पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यानेच निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. या सर्वांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादाने जर यावर अॅक्शन घेतली तर त्यावर कारवाई होऊ शकते. मी आदित्य ठाकरेंना आवाहन आवाहन करतो की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा. यासोबतच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ईडीवाले तुम्ही ऐका. सीबीआयवाल्यांनी देखील ऐकावे. हा जो किरीट समोय्या आहे. तो एक फ्रॉड आहे. त्याने बँक घोटाळा केलेला आहे. तसेच लोकांचे पैसे देखील बुडवले आहेत. आता निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची आणि नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

19 बंगले पाहायला बस करुन जाऊ, जर ते दिसले नाही तर अख्खी शिवसेना ‘दलाला’ला जोड्याने मारेल

संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांच्या समर्थनार्थ जमलेले सैनिक

2009 मध्ये अन्वय नाईकांनी कोर्लई गावात 19 बंगले बांधले. हे बंगले उद्धव ठाकरेंचे असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केला आहे. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे कधी घडले नव्हते. या पध्दतीचे राजकारण राज्यात यापूर्वी कधीच झाले नव्हते. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांविषयी दर दिवशी काही आरोप केले जात आहेत. भाजपचा दलाल किरीट सोमय्या म्हणतात की, ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझे त्या दलालाला आव्हान आहे. कधीही सांगा. आपण चार बसेस करु आणि त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडीन. जर दिसले नाही. तर त्या दलालाला अख्खी शिवसेना जोड्याने मारेन.’

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘दिशाभूल करायची, भंपकपणा करायचा असे काम भाजपचे सुरु आहे. चला दाखवा मग बंगले, आपण पार्टी करु. हा भंपकपणा सुरु आहे. ही महाराष्ट्राविषयी असूया आहे. मराठी भाषेविषयी असूया आहे. मुंबईतून मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असू नये अशी पीटिशन किरीट सोमय्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. जो माणूस मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला. आणि काय तुम्ही सांगता की, मराठी भाषेचा अभिजात दर्जा आम्ही देतो म्हणून.’ असे म्हणत सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, संजय राऊत म्हणाले की, माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक का त्रास देत आहेत, असा प्रश्न करून त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपचे काही प्रमुख लोक मला भेटले. वारंवार मला हेच सांगितले की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचे. आमची सगळी तयारी झाली आहे. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटले हे कसे शक्यय? याच्यावर त्यांनी सांगितलं की, तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपकडून निर्घृणपणे राजकारण सुरु
बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला झुकू नका, असे सांगितले. मी त्यांना नाही म्हटले म्हणून माझ्या आणि नातेवाईकांच्या घरी छापा टाकला. त्यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आहेत. माझे मुले, नातेवाईक, मित्रपरिवार प्रत्येकाला बदनाम करायचे. मुलांना फोन करुन ईडी घडी येते, वडिलांना अटक करुन घेऊन जातील, असे सांगितले जाते. इतके निर्घृणपणे राजकारण भाजपकडून सुरु आहे.” असेही राऊत म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...