पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे 5 येथे गोपाळकाला म्हणजे पुस्तकहंडीचा आनंदोत्सव ‘शैक्षणिक पुस्तक हंडी ‘ साजरी करून चिमुकल्यांनी साजरा केला. सजवलेल्या पुस्तक हंडीसोबत पाटी, पेन,पेन्सिल, वही, पुस्तक, छान छान गोष्टींची पुस्तके, शैक्षणिक साहित्य बांधून पुस्तक हंडीचा आनंद लुटला.लहानपणी श्रीकृष्ण आपल्या नटखट लीलांमधून सवंगड्यांसह घराघरातून लोण्याची चोरी करून गोपालांना वाटून खात. विद्यार्थ्यांनी गोष्टीची पुस्तके लुटून ती वाचनाचे ज्ञानरुपी लोण्याची चव चाखली.टिपऱ्यांच्या विविध गीतांवर ठेका धरला,तसेच फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. पोहे, दही, दूध, साखर, लोणी यांचा प्रसाद वाटण्यातआला.संस्कृतीची जोपासना करत पुस्तक हंडीच्या उत्सवातून विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी लोण्याचा आस्वाद देत वाचनाची गोडी लावणारा हा सण बालगोविंदांनी उत्साहात साजरा केला. त्यानंतर पुस्तक हंडी फोडण्यात आली.लहान वयापासून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत, या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. म्हणूनच दर वर्षी पुस्तक हंडीचा सण शाळेत उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शाळेतील 1400 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. सकाळी आठ वाजल्यापासून शाळेत पुस्तक हंडीची तयारी सुरू झाली. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका संगीता लकारे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण यांनी केले.गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.मॉडर्न शाळेत कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. पुस्तक हंडीच्या कार्यक्रमातही नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो.या उपक्रमासाठी नवेश पाटील,खंडू खेडकर, नितीन डेरे,दिनेश कुलकर्णी,संतोष भागीत,विकास पवार,महेश सुपेकर,सुमिता पाटील,वंदना सोनोने,दादाभाऊ शिनलकर,प्रमोद शिंदे,गणपत नांगरे,अमित ओमासे,प्रशांत बुधिहाळ,सुनिता शिरसाट यांनी सहकार्य केले.या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह नगरसेविका पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.