पुणे- शिवरायांचा नुसता जयजयकार करणे किंवा केवळ त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे पुरेसे नव्हे तर शिवप्रभूंचे चारित्र्य आचरणात आणणे महत्त्वाचे आहे असे मत भाजप चे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉ अरुण दातार,शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित अनंतराव शेळके(कबड्डी) अभिषेक केळकर (बुद्धिबळ) कोमल पाठारे घारे (तायक्वांदो) आणि ऋतुजा सातपुते( सायकलिंग) ह्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महोत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप युवा मोर्चा चे अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे,मंदार बलकवडे,विशाल भेलके,उमेश भेलके इ मान्यवर उपस्थित होते.भाजप चा भर हा तरुणांना टी व्ही च्या मायाजालातून दूर करून क्रीडांगणावर आणणे हा असून त्यासाठीच विविध शाळांमध्ये क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहेत असे ही ते म्हणाले.
*Healthy Mind Resides in a Healthy Body* हा मंत्र ध्यानात ठेवा,मी सातत्याने पासष्ट वर्ष सूर्यनमस्कार घालत असून आपल्यापैकी कोणाला ही सूर्यनमस्कार शिकायचे असतील तर मी उपलब्ध आहे असे शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ अरुण दातार म्हणाले.शहरातील सर्व बागा ,क्रीडांगण, इमारतींच्या गच्चीवर सूर्योदयाला नागरिक व्यायाम करताना दिसावेत असे माझे स्वप्न असून त्यादिवशी माझ्या जीवन गौरव पुरस्काराचे सार्थक होइल असे ही ते म्हणाले.
सध्याची सामाजिक स्थिती पाहता शिवप्रभुंचे आचार विचार हेच तारणहार असल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले,शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांनी कोथरूड चे नाव जगात पोहचविले असून त्यांच्या सन्मान करण्याची संधी आम्हांस मिळाली हे आमचे भाग्य आहे,शिवजयंती ही गणेशोत्सवाप्रमाणे घराघरात साजरी व्हावी असे ही ते म्हणाले.यशवंतराव चव्हाण नाटयगृहात आयोजित शिवजयंती महोत्सवात आज फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अकलूजच्या लावणी महोत्सवात सलग अकरा वर्ष पारितोषिक जिंकणारे लावणी कलावंत योगेश देशमुख आणि पूनम यांना ही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर विशाल भेलके ,उमेश भेलके मंदार बलकवडे यांनी स्वागत व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.


